
-विलास कुलकर्णी
राहुरी : तनपुरे साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या निमित्ताने एक महिनाभर तालुक्यातील राजकारण ढवळून निघाले. कारखाना चालविण्याचे शिवधनुष्य कोणाच्या हाती द्यायचे, याचा फैसला सभासदांनी केला. राहुरी बाजार समितीचे सभापती अरुण तनपुरे यांच्या ताब्यात सभासदांनी कारखान्याची सूत्रे सोपविली. या निवडणुकीतून तालुक्याच्या बदलत्या राजकारणाची दिशा अधोरेखित झाली आहे.