माझ्यावर कारवाई करु नका नाही तर मी आत्महत्या करील; इगतपुरीच्या शिक्षकाला अकोलेत दारु विकताना पडकले

शांताराम काळे
Saturday, 2 January 2021

भंडारदरा येथील थर्टी फस्टला यावर्षी गालबोट लागले आहे. राजुर पोलिसांनी भंडारदऱ्याजवळील मुरशेत येथील एका टेंट हाऊसवर धाड टाकत दारुसह एक चारचाकी ताब्यात घेत चार लाख दहा हजाराचा मुद्देमाल जप्त केला आहे.

अकोले (अहमदनगर) : तालुक्यातील भंडारदरा येथील थर्टी फस्टला यावर्षी गालबोट लागले आहे. राजुर पोलिसांनी भंडारदऱ्याजवळील मुरशेत येथील एका टेंट हाऊसवर धाड टाकत दारुसह एक चारचाकी ताब्यात घेत चार लाख दहा हजाराचा मुद्देमाल जप्त केला आहे.

भंडारदरा येथे सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी व नविन वर्षाच्या स्वागतासाठी हजारो पर्यटक आले होते. या पर्यटकांवर नजर ठेवण्यासाठी राजुर पोलिस 31 डिसेंबरच्या मध्यरात्री पेट्रोलिंग करत असताना भंडारदरापासून जवळच मुरशेत येथील एका टेंट हाऊस पासून जात होते. तेव्हा दारुची विक्री पर्यटकांना अव्वाच्या सव्वा भावात केली जात होती.

राजुर पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरीक्षक नितिन पाटील यांच्या ही बाबत लक्षात आली. त्यांनतर राजुर पोलिसांनी तात्काळ कारवाई करत चार लाख दहा हजार रुपयांचा किंमती दारुचे दोन बॉक्स व एक चार चाकी ताब्यात घेतली. यावेळी या टेंटच्या मालकाने राजुर पोलिसाना तुम्ही जर माझ्यावर कारवाई केली तर मी आत्महत्या करेल, अशी धमकी दिली. विशेष म्हणजे हा टेंटचालक शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत आहे. 

नगर जिल्ह्यातील बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
राजुर पोलिसांनी दोन व्यक्तींना या संदर्भात ताब्यात घेतले आहे. त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. या धाडसत्रामध्ये राजुर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक नितिन पाटील, पोलिस उपनिरीक्षक नितिन खैरनार, पोलिस हेड कॉस्टेबल भाऊसाहेब आघाव, पोलिस कॉस्टेबल प्रविण थोरात, अशोक गाडे, पांडुरंग पटेकर यांनी महत्त्वाची भुमिका निभावत कारवाई केली.

अस्वले हे इगतपुरी तालुक्यात शिक्षक असून पोलिसांनी त्यांना पकडल्यावर माझ्यावर कारवाई केली तर मी आत्महत्या करून तुमचे नाव घेईल, असा सज्जड दम दिला. मात्र पोलिस कारवाईपासून तुस भरही मागे सरकले नाहीत. भंडारदरा परिसरात अवैध्यरित्या दारू विक्री होत असल्याची कुणकुण लागताच राजूर पोलिसांनी सापळा रचून ही कारवाई केली.

संपादन : अशोक मुरुमकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: A teacher from Igatpuri fell while selling liquor in Akole

टॉपिकस