
अकोले : गेल्या बारा वर्षांपासून कायम विनाअनुदान तत्त्वावर ज्ञानदानाचे काम करत असणारे शिक्षक अंशतः अनुदानावर येऊनही शासनाने या निधीची तरतूद न केल्यामुळे शिक्षकावर उपासमारीची वेळ आली आहे. शासनाने तातडीने अनुदान देऊन या शिक्षकांची उपासमार थांबवावी, अशी मागणी आदिवासी संघटनांनी एक निवेदनाद्वारे केली आहे. तसे निवेदन मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री, शालेय शिक्षणमंत्री यांना दिले आहे.