शुभ्र पत्रिकाधारकांना कोणतेही लाभ मिळत नसल्याने त्यांनी ई-शिधापत्रिका करण्याकडे दुर्लक्ष केले आहे.
अहिल्यानगर : स्वस्त धान्य योजनेतील (Grain Scheme) लाभार्थ्यांना धान्य पुरवठा करण्यासाठी शिधापत्रिका तयार करण्यात आली. एका कुटुंबासाठी एक शिधापत्रिका दिली जाते. स्वस्त धान्य योजनेतील धान्याचा काळाबाजार होण्याच्या घटना समोर आल्या. त्यास पायबंद घालण्यासाठी शिधापत्रिकांना (Ration Card) बारा अंकी क्रमांक देण्यास सुरुवात करण्यात आली.