esakal | शेवगावच्या तहसीलदार अर्चना भाकड अपघातात जखमी

बोलून बातमी शोधा

Tehsildar of Shevgaon Bhakad injured in accident
शेवगावच्या तहसीलदार अर्चना भाकड अपघातात जखमी
sakal_logo
By
टीम ई सकाळ

अमरापूर : शेवगावच्या तहसीलदार अर्चना भाकड-पागिरे यांच्या खासगी वाहनाला शेवगाव- पांढरीपूल रस्त्यावर अपघात झाला. मात्र, अपघातातून त्या बालंबाल बचावल्या. हा अपघात काल (ता. 19) दुपारी साडेबाराच्या सुमारास निंबेनांदूर माका शिवारातील खाऱ्याचा ओढा येथे घडला. यावेळी परिसरातील ग्रामस्थांनी पागिरे यांना मदत केली.

तहसीलदार भाकड काल दुपारी साडेबाराच्या सुमारास खासगी वाहनातून (एमएच 17 एजे 4718) माका येथील घरून शेवगावकडे येत होत्या. त्यांचे वाहन शेवगाव-पांढरीपूल रस्त्यावरील माका ते निंबेनांदूरदरम्यान असलेल्या खाऱ्या ओढ्यावरील वळणावर आले असता, त्यांचा वाहनावरील ताबा सुटला. त्यामुळे वाहन थेट ओढ्यात गेले.

ओढ्यात पाणी असल्याने त्यांना बाहेर पडता आले नाही. अपघाताची माहिती मिळताच परिसरातील ग्रामस्थांनी त्यांना वाहनातून बाहेर काढले. त्यानंतर उपचारासाठी शेवगाव येथील खासगी रुग्णालयात दाखल केले. अपघातात वाहनाचे मोठे नुकसान झाले असले, ती तहसीलदार भाकड किरकोळ जखमी झाल्या आहेत.

शेवगाव-पांढरीपूल रस्त्यावर खड्ड्यांची मालिका आहे. ती चुकवताना यापूर्वीही अनेक वाहनांचे अपघात झाले आहेत. आज स्वत: तहसीलदारांच्याच वाहनाला अपघात झाला; मात्र दैव बलवत्तर म्हणून त्या बालंबाल बचावल्या.

बातमीदार - राजू घुगरे