esakal | डोळे दुखतात म्हणून डॉक्टरांकडे अन डोळ्यावर आला..मग लोकांच्याही डोळ्याला डोळा नाही
sakal

बोलून बातमी शोधा

Tension to the administration due to the youth at Pravarasangam due to corona

मूळचा मराठवाड्यातील मात्र रस्ता व पुलांच्या कामानिमित्त प्रवरसंगम (ता. नेवासे) येथे भाड्याने राहात असलेल्या एका तीस वर्षीय तरुणाने डोळे दुखतात म्हणून स्थानिक डॉक्टरांच्या सल्ल्याने शनिवारी (ता,.6) रोजी सकाळी नेवासे फाटा येथील एक खाजगी डॉक्टरांकडे तपासणीसाठी गेला

डोळे दुखतात म्हणून डॉक्टरांकडे अन डोळ्यावर आला..मग लोकांच्याही डोळ्याला डोळा नाही

sakal_logo
By
सुनील गर्जे

नेवासे : डोळे दुखतात म्हणून तो आज सकाळी तपासणीसाठी एका खाजगी डॉक्टरांकडे गेला. डॉक्टरने तो कोरोना संशयीत म्हणून प्रशासनास कळवले. त्यानंतर उडाली प्रशासनासह ग्रामस्थांची एकाच धांदल.. प्रशासनाने त्याला केले जिल्हा रुग्णालयात दाखल  तर ग्रामस्थांनी केले गाव 'लॉक डाऊन'. प्रवरासंगम येथे हा प्रकार घडला. 

हेही वाचा - बॉलिवूडचा अभिनेता सोनू सूद रोहित पवारांबाबत म्हणाला..

मूळचा मराठवाड्यातील मात्र रस्ता व पुलांच्या कामानिमित्त प्रवरसंगम (ता. नेवासे) येथे भाड्याने राहात असलेल्या एका तीस वर्षीय तरुणाने डोळे दुखतात म्हणून स्थानिक डॉक्टरांच्या सल्ल्याने शनिवारी (ता,.6) रोजी सकाळी नेवासे फाटा येथील एक खाजगी डॉक्टरांकडे तपासणीसाठी गेला. तपासणीनंतर संबंधित डॉक्टरने तो तरुण कोरोना संशयित म्हणून प्रशासनास कळवले. आणि प्रशासनाबरोबरच प्रवरसंगम ग्रामस्थांची एकच धावपळ उडाली. प्रशासननाने त्या रुग्णालयात धाव घेऊन त्या तरुणाला कोरोना तापासणीसाठी जिल्हा रुग्णालयाय दाखल केले.

घटनेची माहिती समजताच व्यापारी, ग्रामस्थानीं प्रवरसंगम गाव बंद केले. तालुक्यातही  चांगलीच खळबळ उडाली. प्रवरसंगम व परिसरात भीतीचे वातावरण होते. त्याच्या संपर्कात आलेल्याची भंबेरे उडाली. अशा तणावात प्रवरासंगमकारांचे सर्व लक्ष लागून होते. त्या तरुणांच्या कोरोना तपासणी आहवालाकडेच. त्या तरुणांचा कोरोना अहवाल सायंकाळी साडेसात वाजता निगेटिव्ह आल्याचे जाहीर होताच तालुका प्रशासनासह प्रवरसंगमकरांचा जीव भांड्यात पडला.  

" डॉक्टरांनी त्यांच्या तपासणीत काही लक्षणे आढळल्याने संशय व्यक्त केला. तपासणीनंतर संशय घेणे योग्यच होते. प्रशासनाची व ग्रामस्थांची धावपळ झाली. मात्र तपासणी गरजेचीच होती.
- रुपेशकुमार सुराणा, तहसीलदार, नेवासे