बॉलीवूड अभिनेता सोनू सूद असं काय म्हणाला, रोहित पवारांना...त्याची होतेय चर्चा

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 6 June 2020

एवढेच नव्हे तर त्याच्या घरी जाऊन रोहित यांनी भेट घेत भावना व्यक्त केल्या. कारण सोनू सूदने स्थलांतरित मजुरांना आपापल्या घरी जाण्यासाठी मोठी मदत केली आहे.

नगर : बॉलीवूडच्या मंडळींना आपत्तीच्या केवळ मेणबत्ती लावता येते, अशा शब्दांत त्यांची सोशल मीडियात किंवा तथाकथित समाजसेवक हेटाळणी करीत असतात. मात्र, याला छेद देणारे अनेक कलाकार आहेत. अक्षयकुमार असेल किंवा मराठीतील अगदी नाना पाटेकर किंवा मकरंद अनासपुरे असतील. यांच्यासारखी मंडळी नेहमीच पुढे असतात. आताच्या लॉकडाउनच्या काळातही बॉलीवूडकरांनी मोठं काम केलं. त्यात सलमान खान, अमिताभ बच्चन ही मंडळी अग्रेसर आहेत. मात्र, त्यात एक नाव सध्या ट्रेंडिंगमध्ये आहे ते म्हणजे सोनू सूद. 

खरे तर सोनू सूद टॉलीवूड आणि बॉलीवूडमध्ये व्हिलनचे काम करतो. परंतु वास्तवात तो हिरो ठरतो आहे. लॉकडाउनच्या काळात त्याचे काम उजवे ठरत आहे. सोशल मीडियावर त्याच्या कामाचे कौतुक होत आहे. राजकीय मंडळीही त्याच्याबद्दल आदरभाव दाखवत आहेत. राष्ट्रवादीचे युवा नेते, कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार यांनीही सोनू कामाबद्दल अभिमान वाटत असल्याचे सांगितले आहे.

हेही वाचा - महाराष्ट्रात हा जिल्हा आहे सर्वात मोठा

एवढेच नव्हे तर त्याच्या घरी जाऊन रोहित यांनी भेट घेत भावना व्यक्त केल्या. कारण सोनू सूदने स्थलांतरित मजुरांना आपापल्या घरी जाण्यासाठी मोठी मदत केली आहे. रोहित हेही स्थलांतरीत मजुरांना घरी पोहोचवण्यासाठी काम करतात. महाराष्ट्रात कर्जत-जामखेड मतदारसंघाव्यतिरिक्तही त्यांचे काम सुरू आहे. सॅनिटायझर वाटप, मास्कवाटप, पीपीई किटवाटप, तसेच धान्यवाटपासारखे उपक्रम रोहित पवार महाराष्ट्रात राबवित आहेत. सोनूपर्यंत ही माहिती पोचली आहे.

रोहित पवार यांनी सोनू सूदचे कौतुक केल्यानंतर तो म्हणाला, भाऊ तुमचेही काम चांगले आहे. तुम्हाला भेटून आनंद झाला. आपण असेच चांगले काम सुरू ठेवा. रोहित यांनी सोनू सूदच्या भेटीचे फोटो ट्विटरवर शेअर केले आहेत.

 

सोनूला लॉकडाऊनच्या काळात जवळपास ७० हजार जणांचे फोन आले. ४० हजार जणांच्या रोजच्या भोजनाची व्यवस्था केली. निसर्ग चक्रीवादळाचा फटका बसल्यानंतरही त्याने २८ हजार जणांना मदत केल्याचा दावा केला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: What Bollywood actor Sonu Sood said to Rohit Pawar