उजनीतील पाणीसाठी मायनसमध्ये, शेतकरी आले टेन्शनमध्ये | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

उजनी धरण

दर वर्षी धरण पूर्ण क्षमतेने भरूनही मे महिन्यात पाणीसाठा "मायनस'मध्ये जातो. मागील वर्षी धरण याच महिन्यात 13 मे रोजी "मायनस'मध्ये गेले होते.

उजनीतील पाणीसाठा मायनसमध्ये, शेतकरी टेन्शनमध्ये

सिद्धटेक : उजनी धरणातील उपयुक्त पाणीसाठा संपल्यामुळे ते आता "मायनस'मध्ये आले आहे. मात्र, तरीही धरणातून विसर्ग सुरूच आहे. त्यामुळे पाणलोट क्षेत्रामध्ये अनेक ठिकाणी नदीपात्र कोरडे पडले आहे. उजनी धरणाने आता तळ गाठला असून, त्यातून रोज एक टक्का पाणी कमी होत असल्याची माहिती धरण व्यवस्थापनाने दिली. (Tension to farmers as water from Ujani dam goes into minus)

दर वर्षी धरण पूर्ण क्षमतेने भरूनही मे महिन्यात पाणीसाठा "मायनस'मध्ये जातो. मागील वर्षी धरण याच महिन्यात 13 मे रोजी "मायनस'मध्ये गेले होते. असे असले, तरी पावसाळा सुरू होईपर्यंत समाधानकारक पाणीसाठा धरणात असल्याने, पाणीपुरवठा योजना, तसेच शेतीसाठी सिंचनाचा प्रश्न उद्‌भवणार नाही.

हेही वाचा: गांधींची टिळकांसाठी सभा, महिलेने दिली हातातील सोन्याची पाटली

दरम्यान, सध्या मुख्य कालव्यातून 3150 क्‍यूसेक व बोगद्याद्वारे 570 क्‍यूसेक पाण्याचा विसर्ग धरणातून सुरू आहे. त्यामुळे पावसाळ्याच्या सुरवातीपर्यंत धरण आणखी किती खपाटीला जाते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. याही परिस्थितीत भीमा नदीत पाणी सोडण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

धरणातील पाणीसाठा उणे असला, तरी सोलापूरकरांसाठी साडेपाच टीएमसी पाणी पिण्याकरिता सोडावे लागेल. कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत हा निर्णय झाला आहे.

- धीरज साळे, अधीक्षक अभियंता, उजनी धरण

(Tension to farmers as water from Ujani dam goes into minus)

loading image
go to top