लोकनियुक्त सदस्यांचा कार्यकाळ संपल्याने श्रीरामपूर नगरपालिकेवर प्रांताधिकाऱ्यांचा अधिकार

पालिकेच्या माध्यमातून नागरिकांना चांगल्या सुविधा देण्यात येणार आहेत.
लोकनियुक्त सदस्यांचा कार्यकाळ संपल्याने श्रीरामपूर नगरपालिकेवर प्रांताधिकाऱ्यांचा अधिकार
Updated on
Summary

पालिकेच्या माध्यमातून नागरिकांना चांगल्या सुविधा देण्यात येणार आहेत.

श्रीरामपूर : कोरोनामुळे(corona) सार्वत्रिक निवडणूक घेणे शक्य नसल्याने तसेच निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्यास विलंब होणार असल्याने येथील नगरपालिकेत आता प्रशासकराज लागू झाले आहे. पालिकेच्या(shrirampur nagarparishad ) सत्ताधाऱ्यांचा कार्यकाळ काल (बुधवारी) संपल्यामुळे प्रांताधिकारी अनिल पवार यांनी आज (गुरुवारी) सकाळी प्रशासकपदाची सूत्रे हाती घेतली. यावेळी तहसीलदार प्रशांत पाटील, मुख्याधिकारी गणेश शिंदे यांच्यासह विविध विभागांच्या अधिकाऱ्यांशी प्रांताधिकारी पवार यांनी चर्चा केली. पालिकेवरची निवडणुका लांबणीवर पडल्याने प्रशासक नेमण्यासाठी राज्य सरकारचे प्रधान सचिव महेश पाठक यांनी नुकताच आदेश काढला होता. त्यानुसार प्रांताधिकारी पवार यांना पालिकेच्या प्रशासकपदी नियुक्त करण्याचे आदेश निघाले होते. त्यानुसार त्यांनी आज सकाळी पदभार स्वीकारला.(tenure of elected members from shrirampur nagarpalika has ended)

लोकनियुक्त सदस्यांचा कार्यकाळ संपल्याने श्रीरामपूर नगरपालिकेवर प्रांताधिकाऱ्यांचा अधिकार
अहमदनगरमध्ये थर्टी फर्स्टच्या दरम्यान असणार ८०० पोलिसांचा बंदोबस्त

राज्यातील ओबीसी समाजाच्या राजकीय आरक्षणाचा(Obc arakshan) तिढा सुटेपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेऊ नयेत, असा प्रस्ताव नुकताच विधानसभेत मंजूर झाला आहे. त्यामुळे नगरपालिकेत पुढील निवडणुक होईपर्यंत प्रशासकराज राहणार आहे. प्रातांधिकारी पवार यांनी पालिकेचा कार्यभार हाती घेताच विविध विभागांशी संबंधित बैठक घेतली. त्यात घरपट्टी, पाणीपट्टी, अतिक्रमण, स्वच्छतेसह वसुलीची मोहीम सुरू करण्याचे निर्देश दिले.

लोकनियुक्त सदस्यांचा कार्यकाळ संपल्याने श्रीरामपूर नगरपालिकेवर प्रांताधिकाऱ्यांचा अधिकार
नागपूरात वीस वर्षात १५ छोटे तलाव गायब!

स्थानिक असल्याने शहरातील प्रश्‍नांची जाण आहे. त्यामुळे पालिकेच्या माध्यमातून नागरिकांना चांगल्या सुविधा देणार आहे. शहरातील अनधिकृत अतिक्रणांवर कारवाई करणार आहे. थकीत कर वसुलीवर भर देणार आहे. शहरातील दोन्ही कालव्यांची सफाई करणार आहे.

- अनिल पवार, प्रांताधिकारी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com