thackeray group aggressive for ahmednagar-kopargaon national highway rahuri
thackeray group aggressive for ahmednagar-kopargaon national highway rahuriSakal

Ahmednagar-Kopargaon NH : राष्ट्रीय मार्गाच्या कामासाठी ठाकरे गट आक्रमक; राहुरीत गुरुवारी ‘रस्ता रोको’

Rahuri News : अहमदनगर-कोपरगाव राष्ट्रीय महामार्गाचे रखडलेले काम जलद गतीने करावे.
Published on

राहुरी : अहमदनगर-कोपरगाव राष्ट्रीय महामार्गाचे रखडलेले काम जलद गतीने करावे, या मागणीसाठी शिवसेना (ठाकरे गट) पक्षातर्फे जिल्हा प्रमुख (उत्तर) रावसाहेब खेवरे यांच्या नेतृत्वाखाली येत्या गुरुवारी (ता. ४) सकाळी ११ वाजता कृषी उत्पन्न बाजार समिती समोर अहमदनगर-मनमाड रस्त्यावर रस्ता रोको आंदोलन होणार आहे.

निवेदन तहसीलदार नामदेव पाटील व पोलिस निरीक्षक संजय ठेंगे यांना शिवसेना (ठाकरे गटाचे) तालुका प्रमुख सचिन म्हसे, कैलास शेळके आदींनी दिले. निवेदनात म्हटले की, अहमदनगर-कोपरगाव रस्त्याचे काम रखडले आहे. त्यामुळे रस्ता अपघातात अनेक निष्पाप नागरिक बळी पडले आहेत. अनेकांना कायमस्वरूपी अपंगत्व आले आहे.

रस्त्याचे काम अत्यंत संथ गतीने व निकृष्ट दर्जाचे चालू आहे. रस्त्याच्या कामाचा दर्जा उत्कृष्ट राखून जलद गतीने काम व्हावे. पावसाळ्यापूर्वी रस्ता दुरुस्तीच्या केलेल्या कामाची एकाच पावसात वाताहात झाली. बुजवलेले खड्डे पुन्हा उघडे पडले. त्या खड्ड्यांत वाहने आदळून अपघात वाढले आहेत. रस्त्याची प्रचंड दुरवस्था झाली आहे.

thackeray group aggressive for ahmednagar-kopargaon national highway rahuri
Ahmednagar : ‘सेतू’ केंद्रचालकांची वाढली मनमानी; दाखल्यांसाठी आर्थिक पिळवणूक; सर्वसामान्यांची लूट, प्रशासनाचे दुर्लक्ष

येत्या चार-पाच दिवसात जलद गतीने रस्त्याचे दर्जेदार काम सुरू करावे. अन्यथा, येत्या गुरुवारी (ता. ४) सकाळी ११ वाजता रस्ता रोको आंदोलन छेडले जाईल. त्याची सर्वस्वी जबाबदारी रस्त्याचे ठेकेदार व राष्ट्रीय महामार्गाचे प्रकल्प अधिकारी यांच्यावर राहील, असेही निवेदनात म्हटले आहे. या निवेदनावर तालुका प्रमुख सचिन म्हसे, कैलास शेळके, पोपट शिरसाठ, रमेश खुळे व इतरांच्या सह्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com