पारनेरमध्ये अडकलेले परप्रांतीय मजूर रवाना, आमदार लंके यांच्या पुढाकाराने घरवापसी

Thanks to the efforts of MLA Lanka, workers from Uttar Pradesh reached home
Thanks to the efforts of MLA Lanka, workers from Uttar Pradesh reached home

पारनेर - कोरोना विषाणूचा वाढता प्रभाव व  प्रशासनाने जाहीर केलेल्या लॉकडाऊनमुळे पारनेर नगर तालुक्यात हजारो परप्रांतीय बांधव उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, राजस्थानसह इतर अनेक राज्यांतून रोजीरोटीसाठी आपल्या कुटुंबाची उपजीविका चालवण्यासाठी हजारो किलोमीटरवर येऊन विविध क्षेत्रात रोजगाराच्या माध्यमातून योगदान देत आहेत. कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे सर्व औद्योगिक वसाहत, बांधकाम व इतर क्षेत्रात काम करणाऱ्या अनेक परप्रांतीय कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे.

या परप्रांतीय कामगार बंधूंचे रोजगार नसल्याने दैनंदिन ससेहोलपट चालली होती. ते पाहून आमदार नीलेश लंके यांनी 30 मार्चपासून सुपा याठिकाणी अन्नछत्र सुरू केले आहे. संपूर्ण तालुक्यात अनेक गावांमधील निवारा केंद्रांची व्यवस्था करण्यात आली. आमदार लंके त्यांच्या अन्नछत्रामधून सदर परप्रांतीय बांधवांना दैनंदिन सुरुची भोजन पुरवण्याचा यशस्वी प्रयत्न नीलेश लंके प्रतिष्ठान व राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून करण्यात येत आहे .

लॉकडाऊन झाल्यापासून सर्व परप्रांतीय बांधवांना आमदार नीलेश लंके यांच्या प्रयत्नातून व मा.जिल्हाधिकारी अहमदनगर यांच्या आदेशानुसार गुरुवारी सर्व परप्रांतीय बांधवांची वैद्यकीय तपासणी करत विभागीय अधिकारी व तहसीलदार पारनेर यांच्या सहकार्यातून परप्रांतीय बांधवांना उत्तर प्रदेश,मध्य प्रदेश व इतर राज्यातील बांधवांना रेल्वे सेवा उपलब्ध करून दिली. परंतु बिहार येथे जाण्यासाठी रेल्वेसेवा उपलब्ध होत नव्हती, तेव्हा प्रशासकीय पातळीवर पाठपुरावा करत व सदर शेकडो परप्रांतीय बांधवांना राहण्याची व जेवणाची व्यवस्था करत गुरुवारी त्यांची वैद्यकीय तपासणी करत त्यांची रवानगी केली.

सुपा येथून 14 बस पारनेर इथून 14 बस व भाळवणी येथून 2 बस असे एकूण 3O बस एसटी महामंडळाचे पारनेर आगारप्रमुख भोपळे यांच्या प्रयत्नांतून बस उपलब्ध करण्यात आल्या. नगर रेल्वेस्थानकापर्यंत या बांधवांना पोहोचविले. नगर रेल्वेस्थानकावर सर्व बांधवांना सुरुची भोजन देत त्यांचा यथोचित सन्मान करत त्यांची आपापल्या राज्यामध्ये रवानगी केली.आमदार लंके व सर्व प्रशासकीय यंत्रणेचे योगदान व प्रेम पाहून परप्रांतीय बांधव भावनावश होत रेल्वेसेवा उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांनी आमदार लंके व प्रशासनाचे  आभार मानले.

यावेळी पालकमंत्री तथा ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी सुपा चौकात सर्व बसला हिरवा झेंडा दाखवत त्यांची नगर रेल्वे स्थानकावर जाणाऱ्या सर्व बसला बिहारला जाण्यासाठी निघालेल्या परप्रांतीय बांधवांची रवानगी केली. या वेळी पालकमंत्री मुश्रीफ यांच्यासमवेत आमदार नीलेश लंके, पारनेरच्या तहसीलदार ज्योती देवरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी, नीलेश लंके प्रतिष्ठानचे अनेक पदाधिकारी व सहकारी यावेळी उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com