क्रिकेटपटू अजिंक्य रहाणेच्या मामासोबत घडलं असं...सारेच हळहळले

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 21 May 2020

झहीरनंतर अजिंक्य देशाच्या संघात नगर जिल्ह्याचे नाव गाजवत आहे. त्याचे अजिंक्य रहाणे यांचे मूळ गाव संगमनेर तालुक्यातील चंदनापुरी हे आहे. त्यांचे आजोळ संगमनेर तालुक्यातीलच आश्वी खुर्द आहे.

संगमनेर :  भारतीय क्रिकेट संघातील आघाडीचा फलंदाज  अजिंक्य रहाणे हा मुंबईकर म्हणून ओळखला जातो. मात्र, तो नगर जिल्ह्यातील आहे. अजिंक्यपूर्वी नगर जिल्ह्यातील श्रीरामपूर तालुक्यातील झहीर खानने देशाचे प्रतिनीधीत्त्व केले होतं. तो गोलंदाजीची धुरा सांभाळत होता. 

झहीरनंतर अजिंक्य देशाच्या संघात नगर जिल्ह्याचे नाव गाजवत आहे. त्याचे अजिंक्य रहाणे यांचे मूळ गाव संगमनेर तालुक्यातील चंदनापुरी हे आहे. त्यांचे आजोळ संगमनेर तालुक्यातीलच आश्वी खुर्द आहे.

या गावात प्रगतशील शेतकरी असलेले त्याचे मामा राहतात. राहणे यांच्या लहानपणाच्या असंख्य आठवणी या गावाशी गावाच्या परिसराशी निगडित आहेत. लहानपणी सुट्टीत आई-वडिलांबरोबर आल्यावर विहिरीत पोहण्यापासूनच्या आठवणी सांगितल्या जातात. कधी गावातच क्रिकेटचा डावही रंगायचा. मात्र, ज्या विहिरीवर अजिंक्य गेला. तेथे काल आक्रीत झालं.

हेही वाचा - कोरोनाने नगर शहराच्या मध्यवस्तीला घेरलं

 त्याचे मामा राजेंद्र राधाकृष्ण गायकवाड (वय 65) यांचे निधन झाले. ते मोटार चालू करण्यासाठी गेले होते. त्यावेळी पाय घसरून ते विहिरीत पडले. त्यातच त्यांचे निधन झाले. या घटनेमुळे रहाणे आणि गायकवाड कुंटुंबावर शोककळा पसरली आहे.

ती आठवण पुन्हा जागी झाली

अजिंक्यची भारतीय क्रिकेट संघात निवड झाली होती. तेव्हा एकट्या संगमनेर तालुक्यालाच नाही तर नगर जिल्ह्याला आनंद झाला होता. तो आनंद साजरा करण्यासाठी अजिंक्यचा भूमिपुत्रांच्या वतीने मोठा सत्कार करण्यात आला होता. गावातून मिरवणूकही काढली होती. त्याचे सर्व नियोजन मामा लोकांनी केले होते. राजेंद्र गायकवाड हेही आपल्या भाच्याने नाव कमावल्याचे सर्वत्र सांगत. त्यांना अजिंक्यचा मोठा अभिमान होता. अजिंक्यला मामाच्या मृत्यूची माहिती कळताच तोही हळहळला.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Cricketer Ajinkya Rahane's uncle dies