शिरूर कासारच्या ज्वेलर्सचा मृतदेह शेवगावात आणून पुरला

Dead body
Dead body
Summary

या संदर्भात कुलथे यांच्या नातेवाईकांनी त्यांचे अपहरण झाल्याचा गुन्हा शिरुर कासार पोलिस ठाण्यात दाखल केला होता.

Summary

शेवगाव : शिरुर कासार (जि. बीड) येथील सराफ व्यावसायिकाचा खून करुन मृतदेह पुरावा नष्ट करण्यासाठी भातकुडगाव (ता. शेवगाव) येथे आणून पुरवण्यात आला होता. संबंधित सोनाराच्या नातेवाईकांनी अपहरणाचा गुन्हा दाखल केल्यानंतर शिरुर कासार पोलिसांनी दोन आरोपींना त्वरीत अटक केल्यानंतर खुनाचा प्रकार उघडकीस आला.

या गुन्ह्यात चेतन लोमटे (वय-21) व शिवाजी मांडकर (वय-24) यांना ताब्यात घेतले असून मुख्य आरोपी ज्ञानेश्वर गायकवाड (वय-51) हा पसरा आहे. (The body of Shirur Kasar's goldsmith was buried in Shevgaon)

Dead body
कुकडीच्या पाण्याची चोरी पुण्यात, बंदोबस्त कर्जत-श्रीगोंद्यात

भातकुडगाव येथील ज्ञानेश्वर हरिभाऊ गायकवाड याचे सलूनचे तर विशाल सुभाष कुलथे (वय 25) यांचे शिरुर कासार (जि. बीड) येथे ज्वेलर्सचे दुकान आहे. गायकवाड याने कुलथे यास मोबाईलवर फोन करुन माझा विवाह लॉकडाउनमध्ये झाला आहे.

मला दागिने खरेदी करायचे आहे. माझ्या दुकानात ते दाखवण्यासाठी घेऊन या. त्यानंतर कुलथे यांनी गुरुवार (ता. 20)ला सलूनच्या दुकानामध्ये ठरल्याप्रमाणे दाखवण्यासाठी दागिने आणले असता तेथे ज्ञानेश्वर गायकवाड व त्याच्या साथीदाराने कुलथे यांचा गळा चिरुन खून केला. त्यानंतर दागिने हस्तगत करुन त्यांनी पुरावा नष्ट करण्यासाठी भातकुडगाव (ता. शेवगाव) येथे गायकवाड याच्या शेतामध्ये खड्डा खोदून कुलथे यांचा मृतदेह पुरुन टाकला होता.

या संदर्भात कुलथे यांच्या नातेवाईकांनी त्यांचे अपहरण झाल्याचा गुन्हा शिरुर कासार पोलिस ठाण्यात दाखल केला होता. त्यानंतर पोलिसांनी तपासाची सूत्रे फिरवत गुप्त खबऱ्यांमार्फत मिळालेल्या माहितीनुसार चेतन लोमटे यास ताब्यात घेतले. त्यास पोलिसीखाक्‍या दाखवल्यानंतर त्याने ज्ञानेश्वर गायकवाड व शिवाजी मांडकर यांच्यासह कुलथे यांची गळा चिरुन हत्या केल्याचे सांगितले.

पोलिसांनी आरोपी लोमटे यास काल भातकुडगाव येथे गायकवाड यांच्या शेतामध्ये आणले. त्याने मृतदेह पुरल्याचे ठिकाण दाखवल्यानंतर शेवगाव, शिरुर कासार पोलिस व नागरिकांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढण्यात आला.

मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी शिरुर कासार येथे पाठविण्यात आला. शिवाजी मांडकर यास ही पोलिसांनी ताब्यात घेतले असून मुख्य आरोपी ज्ञानेश्वर गायकवाड मात्र फरार झाला आहे. शिरुर कासार पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सिध्दार्थ माने, सहाय्यक पोलिस निरीक्षक रामचंद्र पवार व कर्मचाऱ्यांच्या पथकाने दोन दिवसात मारेकऱ्यांच्या मुसक्‍या आवळल्या.

(The body of Shirur Kasar's goldsmith was buried in Shevgaon)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com