कुकडीच्या पाण्याची चोरी पुण्यात, बंदोबस्त कर्जत-श्रीगोंद्यात

कालवा.
कालवा.ई सकाळ

श्रीगोंदे : कुकडीच्या उन्हाळी आवर्तनात नियोजन फेल जाणार व त्याचे खापर श्रीगोंद्याच्या माथी फोडले जाणार, यासाठी यंत्रणा कामाला लागली आहे. येडगाव धरणातून 20 मे रोजी सायंकाळी पाच वाजता 1400 क्‍यूसेक्‍सने पाणी सोडले ते ताशी दोन किलोमीटर वेगाने येणे अपेक्षित आहे. मात्र, 75 तास झाल्यानंतरही पाणी श्रीगोंद्याच्या 110 व्या किलोमीटरला पोचले नव्हते. वरच्या भागातील बंधाऱ्यांत पाणी वळविल्याचा आरोप होत असून, वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष घालण्याची मागणी होत आहे. (Theft of Kukdi canal water from farmers in Pune district)

कुकडी प्रकल्पाच्या डाव्या कालव्याचे आवर्तन सुरू झाल्याने इतरांना जसा आधार मिळाला, तसा सर्वाधिक आधार श्रीगोंद्यातील फळबाग शेतकऱ्यांना मिळाला आहे. डाळिंब, लिंबू, द्राक्ष या फळबागांना पाण्याची सध्या नितांत गरज आहे. ढगाळ वातावरण आणि सुटलेला वारा जमिनीतील उपलब्ध पाणी कमी करीत असतानाच आता हे आवर्तन म्हणजे पिकांना संजीवनी देणारे ठरणार आहे.

कालवा.
राष्ट्रवादीच्या आमदाराला पवारांनी ब्रीच कँडीत हलवलं

येडगाव धरणातून 1400 क्‍यूसेक्‍सने सोडलेले पाणी ताशी दोन किलोमीटर वेगाने चालते. मात्र श्रीगोंद्याची हद्द सुरू होती त्या 110 व्या किलोमीटरला रात्री आठ वाजेपर्यंत पाणी आले नसल्याची माहिती आहे. त्याला अधिकाऱ्यांनीही दुजोरा दिला.

दरम्यान, चार दिवसांत पाणी करमाळ्यापर्यंत नेण्याचे अधिकाऱ्यांनी ठरविले होते. त्याला आता खीळ बसणार आहे. नियोजन कमी दिवसांत करायचे असल्याने सगळ्यांनी लक्ष श्रीगोंद्यावर केंद्रीत केले आहे. त्यामुळे पाण्याचे नियोजन बिघडले की श्रीगोंद्यातील शेतकऱ्याला खलनायक ठरविले जाते. वास्तव असे आहे की वरच्या भागात पाण्याचा होणारा वापर कुणीही पाहत नाही.

पोलिस बंदोबस्त श्रीगोंदे, कर्जतलाच का?

कुकडी कालवा सल्लागार समितीत श्रीगोंद्याचे आमदार बबनराव पाचपुते, माजी आमदार राहुल जगताप व राष्ट्रवादीचे नेते घनश्‍याम शेलार आहेत. त्यांनी समिती बैठकीत पाण्याला पोलिस बंदोबस्त केवळ श्रीगोंदे अथवा कर्जतपुरताच का असतो, वरच्या भागात हा नियम का लावला जात नाही, अशी विचारण्याची गरज आहे. मात्र त्यावर कुणीही चर्चा करीत नाही.(Theft of Kukdi canal water from farmers in Pune district)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com