शनिशिंगणापुरातील काळ्या बाहुलीलाच लागली "नजर"

शनिशिंगणापुरातील काळ्या बाहुलीलाच लागली "नजर"

सोनई : कुणाची नजर लागणार नाही, कुठली बाधा होणार नाही आणि हातामध्ये सतत पैसा खेळत राहील, असे सांगून शनिशिंगणापुरात काळी बाहुली विकली जाते. सध्याच्या कोरोना स्थितीमुळे काळ्या बाहुल्यावाल्यांचेच डोळे पांढरे व्हायची वेळ आली आहे. या बाहुलीच्या व्यावसायालाच आता कोरोनाची नजर लागली आहे. भाविकच येत नसल्याने बाहुली विकायची कोणाला असा प्रश्न पडला आहे.(The business of black dolls in Shanishinganapura is in trouble)

शनिशिंगणापुरातील काळ्या बाहुलीलाच लागली "नजर"
मी पस्तीस वर्षे हटत नसतो, आमदार लंकेंनी सांगितला राजयोग

शनिशिंगणापूरला पुर्वी फक्त रुईच्या पानाचा हार व तेल अर्पण केले जात होते. मात्र, सन १९९३ ला 'सूर्यपुत्र शनिदेव' हा चित्रपट प्रदर्शित झाला आणि हे मुलखावेगळं गाव पाहण्यासाठी व स्वयंभू शनिमुर्तीचे दर्शन घेण्यासाठी गर्दी वाढली. गर्दीचा फायदा म्हणून पूजासाहित्यात वस्तूची रेलचेल झाली. पूजेचे महत्व व त्याचा फायदा कसा होतो याकरीता बहूभाषिकांना मोठ्या पगारावर नेमण्यात आले. (The business of black dolls in Shanishinganapura is in trouble)

कोरोना स्थितीमुळे येथील मंदीर दीड वर्षांपासून बंद असून पूजेच्या ताटात असलेल्या काळ्या बाहुलीचे उत्पादन करणारे पन्नासहून अधिक व्यावसायिक आर्थिक अडचणीत सापडले आहेत. काळी बाहुली दरवाज्याला उलटी टांगल्यावर कुणाची नजर लागणार नाही, असे सांगितले जात होते. आता मात्र, या धंद्यालाच नजर लागून व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ आली आहे. यंत्र, पादुका, नवधान्य, शिक्का, नाल या वस्तूसुध्दा साडेसातीत अडकल्या आहे.

दीड वर्षांपासून शनिदर्शन बंद असल्याने येथील हजारो लहान मोठ्या उद्योगाची वाताहत झाली आहे. परिसर व शिंगणापूर ते शिर्डी मार्गावरील सर्व व्यवसाय बंद पडून त्याचा अर्थकारणावर परिणाम झाला आहे. ट्रस्टची देणगी व सर्व उत्पन्न बंद असल्याने सुविधा व उपक्रम सुरु ठेवणे अवघड झाले आहे. नियमावली ठरवून मंदीर सुरू करावे, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.

मंदिर बंदचा सर्वाधिक फटका लहान व्यावसायिकांना व हातावर पोट असलेल्या कुटुंबास झाला आहे. रुईचे पाने आणून हार करणे व काळी बाहुली तयार करून रंगरंगोटी करणे या करीता संपूर्ण कुटुंब रात्रंदिवस झटते. कोरोना संकटाचा फटका गावाबरोबरच परिसरालाही बसला आहे.

- शरद गोपीनाथ पवार, ठोक विक्रेते, शिंगणापूर

(The business of black dolls in Shanishinganapura is in trouble)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com