esakal | गृहविलगीकरण बंदच, कोविड सेंटरमध्येच भरती व्हावे लागेल
sakal

बोलून बातमी शोधा

हसन मुश्रीफ

गृहविलगीकरण बंदच, कोविड सेंटरमध्येच भरती व्हावे लागेल

sakal_logo
By
मार्तंड बुचुडे

पारनेर ः राज्यात कोरोना महामारीने वर्षभरापासून थैमान घातले आहे. अनेकांचा कोरोनाने बळी घेतला आहे. कुटुंबात एखाद्याला कोरोनाची लागण झाली की कुटुंबातील इतर सदस्यांनाही कोरोनाची बाधा होऊन संपुर्ण कुटुंबची कुटुंबे उद्ध्वस्त झाली आहेत. या पुढील काळात तालुक्यात व जिल्ह्यातही होम क्वारंटाईनऐवजी कोविड सेंटरमध्येच कोरोना रूग्णांना दाखल करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केले.

पालकमंत्री मुश्रीफ यांनी आज (ता. २६ ) सकाळी भाळवणी येथील आमदार नीलेश लंके यांच्या पुढाकारातून सुरू करण्यात आलेल्या एक हजार शंभर बेडच्या शरदचंद्र पवार कोविड सेंटरला भेट दिली. त्या नंतर नंदनवन मंगल कार्यालयात त्यांनी कोरोना परस्थितीचा आढावा बैठक घेतली. त्या बैठकीत मुश्रीफ बोलत होते.(The corona positive patient will have to be admitted to the Covid Center)

हेही वाचा: वाडीतली पोरं सगळ्यात म्होरं ः १६ फौजदार, १४ क्लासवन अधिकारी

या वेळी आमदार नीलेश लंके, जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, प्रांताधिकारी सुधाकर भोसले, जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी जगन्नाथ भोर, आरोग्य अधिकारी डॉ. संदीप सांगळे, उपविभागीय अधिकारी अजित पाटील, महावितरणचे अभियंता प्रशांत आडभाई, नगरपंचायतच्या मुख्याधिकारी डॉ. सुनीता कु्मावत, गटविकास अधिकारी किशोर माने, पोलिस निरीक्षक घनश्याम बळप, आरोग्य अधिकारी डॉ. प्रकाश लाळगे, डॉ. बाळासाहेब कावरे, डॉ. मानसी मानोरकर, डॉ. राजेंद्र लोंढे आदी उपस्थित होते.

या वेळी मुश्रीफ पुढे म्हणाले, गेल्या वर्षभरापासून कोरोमा महामारीत प्रशासकीय पातळीवर मोठ्या प्रमाणात काम सुरू आहे. राज्यातील महसुल, आरोग्य व पोलिस यंत्रणेने सातत्याने काम करत आहे. मात्र, या यंत्रणेने थकून जाऊ नये. कारण कोरोना कधी संपेल हे आता सांगता येणार नाही, त्यामुळे कोरोनाला गाडूनच आपणस पुढे जावे लागणार आहे.

मुश्रीफ पुढे म्हणाले, तालुक्यातील सुमारे २१ गावांनी कोरोना वेशी बाहेरच रोखला आहे. त्यात ते यशस्वी झाले आहे. काम आपणास तालुक्यातील प्रतेक गावात करावयाचे आहे. कारण कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यताही वर्तवण्यात येत आहे, त्यामुळे या तिस-या लाटेच्या मुकाबल्यासाठी आपण सक्षमपणे तयारी करण्याची गरज आहे. तिसर्‍या लाटेत लहान मुलांना अधिक धोका राहाणार असल्याचा तज्ञांचा आंदाज आहे. त्यासाठी आपणास तशी तयारी करणे गरजेच आहे.

नव्याने आता कोरोनाबरोबर म्युकरमायकोसिसचे रूग्णही मोठ्या प्रमाणात जिल्ह्यात वाढत आहेत, त्याचाही मुकाबला भविष्यात मोठ्या प्रमाणात आपणास करावा लागणार आहे.

या वेळी आमदार लंके यांनी महसूल, आरोग्य व पोलिस यंत्रणा तालुक्यात चांगले काम करीत आहे. असे सांगितले. या वेळी प्रांताधिकारी भोसले व तहसीलदार देवरे यांनी तालुक्यातील राबविण्यात आलेल्या विविध उपाययोजनांची माहिती दिली. (The corona positive patient will have to be admitted to the Covid Center)