प्रत्येक उपकेंद्रात मिळणार लसीचा डोस ः मंत्री तनपुरे

डोस वाढवून येताच राबवणार उपक्रम
Minister Prajakt Tanpure
Minister Prajakt Tanpure ई सकाळ
Updated on

तिसगाव : कोरोनाबाधित रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता, प्रत्येक गावातून लस घेण्यासाठी ज्येष्ठ नागरिकांबरोबरच तरुणही आता पुढे येऊ लागले आहेत. प्राथमिक आरोग्य केंद्रात गर्दी होऊ नये म्हणून उपकेंद्रांमध्येदेखील नागरिकांना लस देण्याची व्यवस्था आपण राहुरी- नगर- पाथर्डी मतदारसंघात प्राधान्याने सुरू केली आहे. डोस वाढून येताच जिल्हाभरातील प्रत्येक उपकेंद्रात हा उपक्रम राबविणार आहोत,'' असे राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी सांगितले. (The dose of vaccine will be given in each sub-center)

Minister Prajakt Tanpure
रेमडेसिव्हिरचा काळाबाजार सुरूच, रॅकेटमधील चौघांना अटक

पाथर्डी तालुक्‍यातील करंजी येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्रांतर्गत करंजी गावासह सातवड, भोसे, दगडवाडी, खंडोबावाडी, कान्होबावाडी या ठिकाणी ग्रामस्थांना लसीचा दुसरा डोस देण्यात आला. त्या वेळी तनपुरे यांनी करंजी येथे राबविलेल्या लसीकरण मोहिमेची प्रत्यक्ष पाहणी केली व महत्त्वाच्या सूचना आरोग्य अधिकाऱ्यांना केल्या. त्यावेळी ते बोलत होते.

मच्छिंद्र गोरे, सुधाकर अकोलकर, सुभाष अकोलकर यांनी सांगितले, की तिसगावला पहिला डोस घेतला. त्या वेळी मोठी गर्दी दिसून आली. गर्दी पाहून दुसरा डोस घेण्याची इच्छा नव्हती; परंतु मंत्र्यांनी गावात लस देण्याची व्यवस्था केली.''

लोहसर, चिचोंडी, मिरी येथेही तनपुरे यांनी आरोग्य उपकेंद्रांना भेटी देत लसीकरण मोहिमेचा आढावा घेतला. या वेळी प्रांताधिकारी देवदत्त केकाण, तहसीलदार श्‍याम वाडकर, तालुका आरोग्य अधिकारी भगवान दराडे, सरपंच अमोल वाघ, माजी सरपंच रफिक शेख, युवा नेते जालिंदर वामन, डॉ. होडशीळ यांच्यासह आरोग्य कर्मचारी, अंगणवाडी सेविका, आशा सेविका उपस्थित होत्या.(The dose of vaccine will be given in each sub-center)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com