कोरोनाबाधितांच्या अंत्यसंस्काराचा भारही पेलेना

कोरोना बाधितावर अंत्यसंस्कार
कोरोना बाधितावर अंत्यसंस्कारई सकाळ
Updated on

जामखेड : ग्रामीण भागात कोरोना संसर्गाने मृत्यू झालेल्यांच्या अंत्यसंस्कारासाठी कुटुंबातील व्यक्तींनी असमर्थता दर्शविली, तर त्या मृतदेहाची हेळसांड होऊ नये, यासाठी गावपातळीवर अंत्यसंस्कार करण्यासाठीचे नियोजन नाही.

या संदर्भात प्रशासनाने वेळीच निर्णय घेऊन, अंत्यसंस्कारासाठी वित्त आयोगातून खर्चाची तरतूद करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागाने धोरणात्मक निर्णय घ्यायला हवेत, अन्यथा कोरोनाने मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या अंत्यसंस्काराचा वारंवार निर्माण होणारा पेच यापुढेही अधिक जटिल होईल.

ग्रामीण भागातील कोरोना संशयित अथवा बाधित व्यक्तींचा उपचार घेण्यापूर्वीच घरी मृत्यू झाला, तर त्या व्यक्तीच्या अंत्यसंस्काराबाबत सातत्याने पेच निर्माण होत आहे. कुटुंबाबरोबरच गावकरीही अंत्यसंस्कारासाठी धजावत नाहीत. मागील दोन महिन्यांपासून कर्जत व जामखेड तालुक्‍यांत याचा प्रत्यय येत आहे. (The gram panchayat does not even have funds for the funeral)

कोरोना बाधितावर अंत्यसंस्कार
राष्ट्रवादीच्या आमदाराला पवारांनी ब्रीच कँडीत हलवलं

कर्जत येथे तर पोटच्या पोराने जन्मदात्या पित्याला अग्निडाग देण्यास असमर्थता दर्शविली, तेव्हा एका अधिकाऱ्याने पुढे होऊन अग्निडाग दिला. पिंपरखेड (ता. जामखेड) येथे सत्तरी ओलांडलेल्या निराधार महिलेच्या मृत्यूनंतर अंत्यसंस्काराचा पेच निर्माण झाला. त्यावेळी युवकांनी पुढाकार घेऊन सर्व सोपस्कार पार पाडत सामाजिक बांधिलकी जपली. मात्र, प्रत्येक वेळी माणुसकी दाखविणारे धावून येतीलच असे नाही. त्यामुळे गावपातळीवर प्रशासनाने ही जबाबदारी निश्‍चित करायला हवी.

गावपातळीवर अधिकार निश्‍चित करायला हवेत. कोरोनाने मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तीच्या अंत्यसंस्कारासाठी लागणारी सर्व साधनसामग्री ग्रामपंचायतीकडे उपलब्ध करून देण्यासाठी तहसीलदार विशाल नाईकवाडे व गटविकास अधिकारी पी. पी. कोकणी यांनी संयुक्त आढावा घ्यावा, अन्यथा कोरोनाबाधित व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर पुन्हा पेच निर्माण होण्याची शक्‍यता आहे. त्यातून प्रशासनाची हतबलता व मृतदेहाची हेळसांड होऊन अंत्यसंस्काराचा तिढा कायम राहणार आहे.

तत्काळ उपाययोजनेची गरज

जामखेड तालुक्‍यात 58 ग्रामपंचायती आहेत. त्यांपैकी काही ग्रामपंचायतींकडे स्मशानभूमी उपलब्ध नाहीत. आगामी दिवस पावसाळ्याचे आहेत. एखादी दुर्दैवी घटना घडली, तर त्याच गावामध्ये कोरोनाबाधित मृतांवर अंत्यसंस्कार करता यावेत, याकरिता प्रशासनाने खबरदारीची उपाययोजना तत्काळ हाती घेण्याची गरज व्यक्त होत आहे.(The gram panchayat does not even have funds for the funeral)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com