बिलासाठी अडवला मृतदेह, मंगळसूत्र विकूनही जमली नाही रक्कम

३८ हजाराच्या रकमेसाठी पाथर्डीच्या महिलेची भटकंती
मृतदेह
मृतदेहई सकाळ

नगर ः शहरातील खासगी हॉस्पिटलमध्ये रुग्णांकडून अवाच्या सव्वा रकमा वसूल केल्या जात असल्याच्या तक्रारी होत आहेत. काल एका खासगी रुग्णालयात माणुसकीला काळिमा फासणारी घटना घडली. दोन लाख आठ हजारांच्या बिलासाठी कोरोनाबाधिताचा मृतदेह हॉस्पिटलने अडवून धरला. हे बिल भरण्यासाठी मृताच्या पत्नीने मंगळसूत्र मोडले. तरीही रकमेची पूर्तता झाली नाही, त्यामुळे तिच्यावर पैशासाठी वणवण फिरण्याची वेळ आली.(The hospital blocked the body due to non-payment)

मृतदेह
अॉक्सीजन लेव्हल ३६, बेडही मिळेना; तरी आजीबाई झाल्या ठणठणीत

शहरातील एका खासगी रुग्णालयात पाथर्डी तालुक्‍यातील शेतकरी असलेला एक कोरोनाबाधित रुग्ण उपचारासाठी दाखल झाला होता. उपचारादरम्यान त्याची तब्येत खालावत गेली. त्यातच गुरुवारी (ता. सहा) सायंकाळी त्याचा मृत्यू झाला. त्यांचे कुटुंबीय अंत्यसंस्कारासाठी नगरमध्ये दाखल झाले.

हॉस्पिटल प्रशासनाने, दोन लाख आठ हजार रुपये भरल्यानंतरच मृतदेह हॉस्पिटलबाहेर सोडू, असे सांगितले. जवळ तेवढे पैसे नसल्याने मृत कोरोनाबाधिताच्या पत्नीने, दुःखाचा डोंगर कोसळलेला असतानाही गळ्यातील मंगळसूत्र व अन्य दागिने सोनाराकडे मोडण्यासाठी नातेवाइकांकडे दिले. पतीच राहिला नाही तर मंगळसूत्र ठेवून करू काय, असे म्हणत तिनी सर्व दागिने दिले. त्यातून एक लाख 70 हजार रुपये मिळाले. ते हॉस्पिटलमध्ये देण्यात आले. तरीही हॉस्पिटल प्रशासनाने उर्वरित 38 हजार रुपये भरल्याशिवाय मृतदेह देणार नसल्याचा पवित्रा घेतला. ही रक्कम जमवण्यासाठी मृताची पत्नी काल दिवसभर गावात व विविध नातेवाइकांकडे फिरत होती.

शासकीय कर्मचाऱ्याला ऑक्‍सिजन कमी पडला

शहरातील एका खासगी रुग्णालयाला जिल्हा प्रशासनाने ऑक्‍सिजन सिलिंडर मंजूर केले; मात्र ते आणण्यासाठी हॉस्पिटलचे कर्मचारी गेलेच नाहीत. त्याऐवजी त्यांनी रुग्णाच्या नातेवाइकांनाच ऑक्‍सिजन आणण्याचा अजब सल्ला दिला. यात कोरोनाबाधित एका शासकीय कर्मचाऱ्याला ऑक्‍सिजन कमी पडल्याने त्याचा मृत्यू झाला, अशी चर्चा नगर शहरात होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com