esakal | कोठारी कुटुंबाकडून एक लाख 11 हजारांची मदत

बोलून बातमी शोधा

Rupees
कोठारी कुटुंबाकडून एक लाख 11 हजारांची मदत
sakal_logo
By
सकाऴ वृत्तसेवा

मिरजगाव (अहमदनगर) : येथील कोठारी परिवाराने जामखेड येथील डॉ. आरोळे कोविड सेंटरला एक लाख 11 हजारांची आर्थिक मदत केली. कर्जत व जामखेड तालुक्‍यांत कोरोनाबाधितांच्या संख्येत भर पडत असल्याने प्रशासनासमोर आव्हान उभे राहले आहे.

हेही वाचा: तिसगाव गटाने सामाजिक बांधिलकी जपली : कर्डिले

या संकटावर मात करण्यासाठी कोविड सेंटरला मदत करण्याचे आवाहन डॉ. आरोळे हॉस्पिटलच्या व्यवस्थापनाने केले होते. त्यास प्रतिसाद देत कोठारी परिवाराने सतीश कोठारी, पप्पू कोठारी, नीलेश मुनोत, सुहास बोरा, कुंदन कोठारी, नीरज कोठारी, मीनल कोठारी, दीपक कोठारी, संजय कोठारी, सुनील कोठारी, अशोक पितळे आदींच्या उपस्थितीत डॉ. आरोळे यांच्याकडे ही रक्कम सुपूर्द केली. डॉ आरोळे यांनी कोठारी कुटुंबीयांचे आभार व्यक्त करून कोरोना रुग्णांसाठी इतरही सामाजिक संस्था व दानशूर व्यक्तींनी पुढे येऊन सहकार्य करण्याचे आवाहन यावेळी केले.

हेही वाचा: राळेगणसिद्धीत 50 बेडचे कोविड सेंटर सुरू

कोरोना रुग्णांसाठी डॉ. आरोळे व त्यांचे सहकारी करत असेलेले कार्य डोळे दीपवणारे आहे. सामाजिक भान जपत गोरगरीब रुग्णांच्या मोफत उपचारासाठी अहोरात्रपणे काम करणाऱ्या या व्यवस्थापनाला मदत करणे हे आमचे भाग्यच आहे. येणाऱ्या काळात देखील मोठ्या हाताने मदत करून डॉ. आरोळे यांच्या सामाजिक कार्यात सहभागी होऊ, असे सतीश कोठारी यांनी सांगितले.