
अहिल्यानगर : भाई का फोन आयेगा उठाले... चंद रुपयों के लिए तुम अपनी जान दाव पर मत लगाओ... अशी फिल्मी स्टाईल जीवे मारण्याची धमकी शहरातील एका व्यापाऱ्याला दिल्याचा प्रकार बुधवारी समोर आला होता. आरोपींनी बनावट आधारकार्डद्वारे सीमकार्ड खरेदी करून फोनवरून खंडणीची मागणी केली होती. दरम्यान, स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी दोन आरोपींना अटक करून त्यांची खंडणी मागणाची भाईगिरी उतरविली आहे.