esakal | दिलासादायक ः बाधितांचा आकडा घटला, काळजी कायम

बोलून बातमी शोधा

कोरोना तपासणी
दिलासादायक ः बाधितांचा आकडा घटला, काळजी कायम
sakal_logo
By
अशोक निंबाळकर

अहमदनगर ः कोरोनाचा आकडा वाढल्याने सर्वांच्याच काळाजाचा ठोका चुकला होता. परंतु शुक्रवारच्या तुलनेत शनिवारी 287 रुग्णांची संख्या घटल्याने काही अंशी दिलासा मिळाला असला तरी बेफिकीर राहून चालणार नाही. सर्वांनीच खबरदारी घ्यावी, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

जिल्ह्यातील कोरोनाचे तीन हजार 880 बाधित आढळून आले होते. काल (रविवारी) तीन हजार 493 नवीन रुग्ण आढळून आले आहेत. यामध्ये नगर शहरातील सर्वाधिक 915 रुग्णांचा यामध्ये उच्चांकी समावेश आहे. राहाता 401 रुग्ण आढळून रुग्ण संख्ये दुसऱ्या क्रमांकावर तर नगर तालुक्‍यात 350 रुग्ण आढळून आले असून तिसऱ्या क्रमांकाची ही संख्या आहे. त्यामुळे उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांनी 23 हजारांचा टप्पा ओलांडला आहे.

जिल्ह्यातील उपचार सुरू असणाऱ्यांची संख्या 23 हजार 203 झाली आहे. दिवसभरात 39 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आता मृत्यूमुखी पडणाऱ्यांची संख्या 1815 झाली आहे. दिवसभरात तीन हजार 553 रुग्ण बरे झाल्याने घरी सोडण्यात आले आहे. बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या एक लाख 34 हजार 491 झाली आहे.

तालुकानिहाय रुग्ण याप्रमाणेः नगरशहर 915, राहाता 401, नगर 350, कर्जत 252, शेवगाव 208, पारनेर 160, जामखेड 154, राहुरी 154, नेवासा 140, कोपरगाव 131, संगमनेर 121, श्रीगोंदा 115, श्रीरामपूर 113, पाथर्डी 98, अकोले 41 रुग्ण आढळून आले. भिंगार छावणी परिषदेच्या हद्दीत 96, बाहेरील जिल्ह्यातील 43.