esakal | कोरोनाबाधितांची संख्या घटली पण वाढत्या मृत्यूमुळे धडकी

बोलून बातमी शोधा

Corona Virus

कोरोनाबाधितांची संख्या घटली पण वाढत्या मृत्युमुळे धडकी

sakal_logo
By
अशोक निंबाळकर

नगर ः "लॉकडाउन'मुळे कोरोनाबाधित रुग्णांची संख्या आटोक्‍यात येण्यास मदत झाली आहे. जिल्ह्यातील बाधितांचा आकडा सलग तिसऱ्या दिवशी कमी आल्याने सर्वांना दिलासा मिळाला; मात्र मृत्यूच्या काल (मंगळवारी) आलेल्या 70च्या आकड्याने सर्वांच्याच मनात धडकी भरली आहे.

जिल्ह्यात दिवसभरात 2655 रुग्ण बाधित आढळून आले. जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या प्रयोगशाळेतील तपासणीत 701, खासगी रुग्णालयातील तपासणीत 1185, रॅपिड अँटिजेन चाचणीत 769 रुग्ण बाधित आढळून आले.

जिल्ह्यात आतापर्यंत एक लाख 62 हजार 375 रुग्ण बाधित आढळून आले आहेत. सध्या 22 हजार 840 रुग्णांवर विविध रुग्णालयांत उपचार सुरू आहेत. दिवसभरात 70 रुग्णांचा मृत्यू झाल्याने, मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या 1919 झाली आहे. दिवसभरात 3195 रुग्ण बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले. आतापर्यंत एक लाख 37 हजार 686 रुग्ण बरे झाले आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 84.80 टक्के आहे.

हेही वाचा: लोकांसाठीच माझं वजन वापरलं, कोणतीही चौकशी करा हो...

तालुकानिहाय रुग्ण याप्रमाणे

नगर शहर 581, राहाता 301, नगर तालुका 221, राहुरी 218, श्रीगोंदे 161, संगमनेर 148, श्रीरामपूर 144, अकोले 133, पारनेर 117, कोपरगाव 116, नेवासे 113, कर्जत 106, पाथर्डी 97, जामखेड 86, शेवगाव 71, भिंगार छावणी परिषद 18 तर परजिल्ह्यातील 24.

नगर शहरातील पाच हजार रुग्णांवर उपचार

शहरात कोरोनाबाधित रुग्ण सापडण्याचे प्रमाण मागील चार दिवसांपासून कमी होत आहे. सध्या शहरात पाच हजार 335 कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू असून, त्यांतील 281 रुग्णांची प्रकृती गंभीर आहे. महापालिकेच्या सातही आरोग्य केंद्रांत स्वॅबसंकलन सुरू आहे. याशिवाय तीन आरोग्य केंद्रांत भारतीय जैन संघटनेच्या मदतीने रॅपिड अँटिजेन टेस्ट सुरू आहेत. आज शहरात 581 कोरोनाबाधित आढळून आले. त्यामुळे आतापर्यंतची बाधितांची संख्या 44 हजार 368 झाली आहे. 38 हजार 490 रुग्णांनी कोरोनावर मात केली. आतापर्यंत नगर शहरातील 558 नागरिकांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. त्यांतील 14 जणांचा आज मृत्यू झाला.