
अहिल्यानगर : जलजीवन योजनेत मंजूर झालेल्या सुमारे शंभर योजनांना विविध कारणांनी खीळ बसली होती. त्यात तब्बल ७५ योजनांच्या कामाचा मार्ग मोकळा झाला आहे. आतापर्यंत २१० योजना पूर्ण झाल्या आहेत. आगामी दोन महिन्यांत ४०० अशा एकूण सव्वासहाशे योजना पूर्णत्वास जातील. त्या दृष्टीने युद्धपातळीवर कामे केली जात आहेत.