esakal | देश आता पुन्हा रांगेत, लसीकरणासाठी उडाली झुंबड

बोलून बातमी शोधा

बारडगाव सुद्रिक लसीकरण केंद्र

देश आता पुन्हा रांगेत, लसीकरणासाठी उडाली झुंबड

sakal_logo
By
सचिन गुरव

सिद्धटेक : देशातील जनतेला आता रांगेत उभे राहण्याची सवय झाली आहे. यापूर्वी नोदबंदी झाल्याने बँकांपुढे रांगा लागल्या होत्या. कोरोनाचा संसर्ग वाढत असताना पुन्हा लसीकरण केंद्रांवर झुंबड उडाली आहे. लसीकरणात सुसूत्रता नसल्याने प्रत्येक केंद्रांवर व्यवस्थेचा बोजवारा उडाला आहे. ही लसीकरण केंद्र गर्दीमुळे कोरोना प्रसार केंद्र ठरण्याची शक्यता आहे.

खेड्यापाड्यांमध्येही कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. बारडगाव सुद्रिक, (baradgaon sudrik) तसेच कुळधरण (kuldharan) येथील आरोग्यवर्धिनी केंद्रांबाहेर लस घेण्यासाठी नागरिकांची गर्दी होत आहे. ज्येष्ठांचे गर्दीमुळे हाल होत आहेत. लसीकरणात सुसूत्रता येऊन नागरिकांची ससेहोलपट थांबणार का, असा सवाल उपस्थित केला जात आहे.(The people of the country are now queuing for corona vaccination)

शहरांनंतर आता ग्रामीण भागात मोठ्या संख्येने कोरोनाबाधित रुग्णांचे प्रमाण वाढत आहे. सुरवातीला लसीकरणाकडे दुर्लक्ष करणारे आता लस घेण्यासाठी आरोग्य केंद्रांबाहेर रांगा लावत आहेत. मात्र, लसीचा साठा मर्यादित असल्याने नागरिकांना हेलपाटे घालावे लागत आहेत. लसीकरणासाठी नोंदणीचे वेळापत्रक नसल्याने नागरिकांना मनस्तापाला सामोरे जावे लागत आहे. लसीकरण केंद्रांवर मोठ्या प्रमाणावर गर्दी होत असल्याने सोशल डिस्टन्सिंगचाही बोजवारा उडत आहे.

हेही वाचा: बंगालमध्ये विधान परिषद का नाही, दीदी कशा होणार मुख्यमंत्री?

"दापोली पॅटर्न' राबविण्याची गरज

लसीकरणासाठी होणारी गर्दी, गोंधळ टाळण्यासाठी अनेक ठिकाणी "दापोली पॅटर्न' राबविला जात आहे. लस उपलब्ध झाल्यानंतर या "पॅटर्न'अंतर्गत संबंधितांना मोबाईलवरून कळविले जाते. त्यामुळे नागरिकांची ससेहोलपट थांबली आहे.

कुळधरण व बारडगाव येथील आरोग्य केंद्रांमध्ये लसीकरणासाठी सध्याची टोकण पद्धत चांगली आहे; परंतु लसींचे नियोजन व साठा वाढविण्याची गरज आहे.

- राजेंद्र गुंड, पंचायत समिती सदस्य

(The people of the country are now queuing for corona vaccination)