
बोधेगाव : सौर कृषी पंप योजना शासनाने सुरू केल्यापासून शेतकऱ्यांना रात्री-अपरात्री जाऊन दारे धरण्याचे काम वाचले आहे. या सौर पंपाच्या साह्याने शेतीला दिवसा पाणी देणे सहज शक्य झाल्याने शेतकरी आनंदात होते; परंतु सौर कृषी पंपाच्या साहित्याची चोरींच्या घटनेत वाढ झाल्याने सौर कृषी पंप असुरक्षित झाले आहेत.