esakal | साईमंदिर भाविकांना दर्शनासाठी खुले
sakal

बोलून बातमी शोधा

shirdi

साईमंदिर भाविकांना दर्शनासाठी खुले

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

शिर्डी : साईमंदिर भाविकांसाठी गुरूवार (ता. सात) पासून खुले केले जाईल. दररोज पंधरा हजार भाविकांना कोविड नियमांचे पालन साईदर्शन घेता येईल, अशी माहिती साईसंस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री बाणाईत यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.

बाणाईत म्हणाल्या, साईभक्‍तांना दर्शनाकरीता online.sai.org.in या संकेतस्‍थळावर ऑनलाईन दर्शन पासच आरक्षण करावे लागेल. तसेच जे साईभक्‍त शिर्डी येथे येतील, अशा साईभक्‍तांना आॅनलाईन दर्शन पासेस बुकिंग करावी लागेल. या पासेस बुकिंग करीता संस्‍थानच्‍या सर्व निवासस्‍थान येथे काऊंटरची व्‍यवस्‍था करण्‍यात आली आहे. पहाटे पाच ते रात्री दहा यावेळेत संस्‍थानचे साईआश्रम एक, श्री साईबाबा भक्‍तनिवास्‍थान (५०० रुम), द्वारावती भक्‍तनिवासस्‍थान, श्रीराम पार्किंग, साई कॉम्‍प्‍लेक्‍स व शिर्डी बसस्‍थानक येथील दर्शन पास दिले जातील.

नित्याच्या काकड आरतीनंतर समाधी मंदिर दर्शनाकरीता खुले करण्‍यात येणार असून, सकाळी सहा ते रात्री दहा यावेळेत मंदिर खुले राहिल. प्रत्‍येक तासाला 1150 साईभक्‍तांना मंदिरात प्रवेश दिला जाईल. प्रत्‍येक आरतीकरीता एकूण 80 साईभक्‍तांना आरतीसाठी प्रवेश देण्‍यात येईल.

त्‍यापैकी प्रत्‍येक आरतीस प्रथम येणाऱ्या शिर्डी ग्रामस्‍थांना दहा पासेस देण्‍यात येतील. ग्रामस्‍थांना दहा आरती पासेस हे साई उद्यान निवासस्‍थान येथून तर दर्शनाचे पासेस मारुती मंदिराशेजारील १६ गुंठे शताब्‍दी मं‍डप येथील काऊंटरवर दिले जातील. ग्रामस्‍थांना मतदान ओळखपत्र व आधारकार्ड शिवाय मंदिरात प्रवेश दिला जाणार नाही. तसेच ऑनलाइनद्वारे २० आरती पासेस, महत्‍वाचे व अतिम‍हत्‍वाचे मान्‍यवर आणि देणगीदार साईभक्‍तांकरीता ५० आरती पासेस दिले जातील.

हेही वाचा: श्रीरामपूर : माळेवाडीत मासेमारीसाठी गेलेले पती-पत्नी बुडाले

सशुल्‍क दर्शन पासेस गेट नंबर एक शेजारील दर्शनरांगेतील पास वितरण काऊंटरवरुन दिले जातील. गर्दी टाळण्‍याकरीता सुरुवातीचे काही दिवस दर गुरुवारची नित्‍याची पालखी बंद राहील. याबरोबरच मंदिरातील साई सत्‍यव्रत पूजा, अभिषेक पूजा, ध्‍यान मंदिर व पारायण हॉल बंद राहतील.

दर्शनासाठी भाविकांना दोन क्रमांकाच्या प्रवेशद्वारातून प्रवेश दिला जाईल. द्वारकामाई मंदिरातून समाधी मंदिरामधून दर्शन घेऊन गुरुस्‍थान मंदिर मार्गे चार व पाच नंबर दरवाजातून बाहेर पाठविले जाईल. दर्शनरांगेत सॅनिटायझेशन, थर्मल स्क्रिनिंग व पाय धुण्‍याची व्‍यवस्‍था केली आहे.

यांना दर्शनास बंदी

साईमंदिर दर्शनासाठी खुले केलेले आहे. मात्र त्यात नियमावली राहणार आहे. साई मंदिरात गर्भवती महिला, दहा वर्षाखालील मुले व वृध्दांना दर्शन घेता येणार नाही, असेही साईसंस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री बाणाईत यांनी दिली.

loading image
go to top