esakal | श्रीरामपूर : माळेवाडीत मासेमारीसाठी गेलेले पती-पत्नी बुडाले
sakal

बोलून बातमी शोधा

husband and wife who went fishing in shrirampur malewadi drowned

श्रीरामपूर : माळेवाडीत मासेमारीसाठी गेलेले पती-पत्नी बुडाले

sakal_logo
By
गौरव साळुंके

श्रीरामपूर (जि. अहमदनगर) : माळेवाडी (ता. श्रीरामपूर) येथे बंधाऱ्यात मासेमारीसाठी गेलेले आदिवासी कुटूंबातील पती-पत्नी बुडाले. चंद्रकला मंजाबापू गायकवाड (वय ३५), मंजाबापू भागवत गायकवाड (वय ४०) असे त्यांची नावे असून आज (मंगळवारी) दुपारच्या सुमारास ही दुर्घटना घडली.


या घटनेची माहिती होताच ग्रामस्थांसह तालुका पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत शोधकार्य सुरु केले. मात्र बंधाऱ्यातील वाहत्या पाण्याचा प्रवाह जलद असल्याने दोघेही पाण्यासोबत वाहून गेले. काही वेळानंतर स्थानिक तरुणांच्या मदतीने चंद्रकला याचा मृतदेह पाण्याबाहेर काढण्यात आला. मंजाबापू यांच्यासाठी सायंकाळी उशिरापर्यंत शोधकार्य सुरु असल्याची माहिती पोलीस निरिक्षक मधुकर साळवे यांनी दिली. पोलिसांनी पंचनामा करुन एक मृतदेह उत्तरणीय तपासणीसाठी येथील रुग्णालयात पाठविला होता. गायकवाड हे पत्नी समवेत बंधाऱ्याच्या भितीवर आज दुपारी मासेमारीसाठी गेले होते. बंधाऱ्याच्या भिंतीवर मासे पकडताना तोल जाऊन ते पाण्यात पडले. त्यांना वाचविण्यासाठी गेलेल्या पत्नी चंद्रकलासह दोघेही वाहत्या पाण्याच्या प्रवाहात वाहून गेले.

हेही वाचा: दोघांना वाचवले, पण पोटच्या मुलाला वाचवताना पित्याचाही अंत


या घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी बंधारा परिसरात गर्दी केली. मात्र वाहत्या पाण्याचा प्रवाह जलद असल्याने वाचविण्यात अपयश आले. पोलिस निरिक्षक साळवे यांच्या पथकाने घटनास्थळी पहाणी करुन माहिती घेतली. याप्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान, मागील महिन्यात तालुक्यातील कान्हेगाव परिसरात दोन चिमुरड्याचा शेततळ्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली होती. त्यानंतर पुन्हा मासेमारीसाठी गेलेल्या गायकवाड यांना आपला जीव गमवावा लागला. यंदाच्या पावसाळ्यात तालुक्यात शेततळ्यात, बंधाऱ्यात, विहरीत व हौदात बुडून मृत्यू झाल्याच्या सुमारे सहा घटना घडल्या आहे.

हेही वाचा: राहुरीत पावसाचा हाहाकार! अनेक गावांचा संपर्क तुटला

loading image
go to top