esakal | मोहरवाडीत वळवले कुकडीचे पाणी, अनुराधा नागवडेंनी काढला मार्ग
sakal

बोलून बातमी शोधा

कुकडीच्या पाण्यासाठी नागवडेंचे आंदोलन

मोहरवाडीत वळवले कुकडीचे पाणी, अनुराधा नागवडेंनी काढला मार्ग

sakal_logo
By
संजय आ. काटे

श्रीगोंदे : कुकडी कालव्यालगत असणारा मोहरवाडी तलाव कोरडा पडल्याने कोळगावकरांना पिण्याचे पाणी मिळत नव्हते. गावकऱ्यांनी पाठपुरावा केला. मात्र यश न आल्याने आज कुकडी कालवा गेटवरच आंदोलन सुरु केले. तरीही अधिकारी ऐकत नव्हते. आंदोलनस्थळी जिल्हा परिषद सदस्य अनुराधा नागवडे आल्या आणि त्यांनी सुत्रे हाती घेत वरिष्ठ अधिकाऱ्यांना गंभीर वास्तव पटवून दिले. काही तासांसाठी कुकडीचे पाणी मोहरवाडी तलावात सुरु झाले.

कोळगाव येथील कोविड सेंटरला सुध्दा पाणी मिळत नसल्याने त्रस्त झालेल्या कोळगावकरांनी आज कुकडी गेटवर आंदोलन केले. सरपंच वर्षा काळे, उपसरपंच अमित लगड, नेते बाळासाहेब नलगे, पुरुषोत्तम लगड, हेमंत नलगे, सुधीर लगड, प्रशांत नलगे, मिठू शिरसाठ आदींनी प्रशासनाला पाणी सोडण्याबाबत आवाहन केले. मात्र, कुणीही एकत नसल्याने ठिय्या आंदोलन सुरू झाले.(The water of Kukdi canal was diverted to Moharwadi lake)

हेही वाचा: वाडीतली पोरं सगळ्यात म्होरं ः १६ फौजदार, १४ क्लासवन अधिकारी

दरम्यान तेथे अनुराधा नागवडे आल्या व त्यांनी अधिकाऱ्यांशी चर्चा सुरु केली. कर्जत हद्दीत जे ६५० क्युसेक्स पाणी द्यायचे आहे. त्याला बाधा न येता काही पाणी मोहरवाडी तलावात सोडून पिण्याचा प्रश्न मिटवा, त्यासाठी आसपासचा सगळा उपसा बंद करण्यात मदत होईल पण लोकांना वाचवा असा आग्रह धरला. त्यावर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी नियोजनात कुठलाही बदल न करता दहा तासांसाठी काही पाणी मोहरवाडीला सुरू केले. याचप्रश्नी माजी आमदार राहूल जगताप, बाळासाहेब नाहाटा, दिनकर पंधरकर यांनीही मध्यस्थी करीत चर्चा केली.

अधिकाऱ्यांनी सहकार्य केले

जलसंपदा विभागाला त्रास होईल असा कुठलाही पवित्रा आंदोलनकांनी घेतला नाही. परिस्थिती गंभीर असून कर्जत व करमाळा तालुक्यात सुरू असणाऱ्या पाण्यात कुठलीही कात्री न लावता हा निर्णय करण्यात आला. यात जलसंपदा विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी व गावकऱ्यांसह इतर नेत्यांनी चांगली भूमिका घेतल्याने ते शक्य झाले.

अनुराधा नागवडे, काँग्रेस नेत्या, श्रीगोंदा.

(The water of Kukdi canal was diverted to Moharwadi lake)