डिकसळच्या पोलिस पाटलाच्या घरी चोरी, कोंबड्याही लांबवल्या

नीलेश दिवटे
Saturday, 19 December 2020

तालुक्यात चोरट्यांनी पुन्हा तोंड वर काढल्याने त्यांच्यापुढे नवे आव्हान निर्माण झाले आहे.

कर्जत : तालुक्यातील कर्जत-मिरजगाव रस्त्यावरील डिकसळ येथे काल रात्री चोरट्यांनी धुमाकूळ घातला. या मध्ये तेथील पोलीस पाटील जयसिंग थेटे यांच्या घराचा कडी-कोयडा उचकटून सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम मिळून एकूण अठेचाळीस हजार पाचशे रुपयांचा ऐवज लंपास केला.

त्यांनी गावातून सोळा कोंबड्यादेखील चोरून नेल्या आहेत आहेत. या बाबत जयसिंग थेटे (वय ४९ रा.डिकसळ) यांनी फिर्याद दिली आहे. येथे हे नव्याने रुजू झालेले पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी तालुक्यात अवैध धंद्याबरोबरच इतरांवर धडाकेबाज कारवाई  सुरू केली आहे.  

तालुक्यात चोरट्यांनी पुन्हा तोंड वर काढल्याने त्यांच्यापुढे नवे आव्हान निर्माण झाले आहे. या बाबत जयसिंग थेटे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार ते काल रात्री पहाटे चार वाजता उठल्यानंतर त्यांच्या असे लक्षात आले की त्यांच्या बैठक रूमच्या शेजारील खोलीचा कडी  आणि कोंयडा उचकटून अज्ञात चोरट्यांनी ऐवज लंपास केला आहे.

या बाबत अधिक तपासणी केली असता त्या मध्ये सोन्याचे मनी झुबे नथ दागिने व पस्तीस हजार रुपये रोख असा एकूण अठेचाळीस हजार पाचशे रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला आहे.

हे चोरटे मोटरसायकलवरून आले होते. त्यांनी गावातील संदीप पवार, सीताराम पवार, नीलेश पवार यांच्या घराचा कडी आणि कोयडा तोडला मात्र ते आवाजाने  वेळीच जागे झाल्याने तिथून चोरट्यांनी पोबारा केला. नंतर पुढे कानिफ धाकड यांच्या घरासमोरील कोंडून ठेवलेल्या सोळा कोंबड्या चोरून नेल्या आहेत.

अहमदनगर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Theft of hens from Dixal

Tags
टॉपिकस
Topic Tags: