Ahilyanagar Crime : साई मंदिरात दर्शन रांगेतून दोन लाख रुपयांची चोरी
साई समाधीचे दर्शन घेताना तेथे त्यांच्या मागून पाच ते सहा जण तेथे आले. त्यात एक महिला होती. त्यांनी पैसे काढून खिशात टाकत असल्याचे दिसत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. तशा आशयाची फिर्याद पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आली. पोलिस निरीक्षक रणजित गलांडे तपास करीत आहेत.
Theft in Sai Baba Darshan Queue; Pilgrim Loses ₹2 LakhSakal
शिर्डी : साईसमाधीजवळ दर्शनार्थीच्या रांगेत उभ्या असलेल्या एका महिलेची पर्स खालच्या बाजूने कापून दोन लाख रुपयांची रक्कम लंपास केल्याची घटना घडली. ही चोरी ‘सीसीटीव्ही’त कैद झाली. या महिलेने पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.