esakal | तीन तालुके फिरूनही मिळेना रेमडेसिव्हिर

बोलून बातमी शोधा

Remdesivir injection

सध्या जिल्ह्यात रेमडेसिव्हिर इंजेक्‍शनचा तुटवडा आहे. धावपळ करूनही रुग्णांच्या नातेवाईकांना इंजेक्‍शन मिळत नाही.

तीन तालुके फिरूनही मिळेना रेमडेसिव्हिर

sakal_logo
By
सकाऴ वृत्तसेवा

पाथर्डी (अहमदनगर) : तालुक्‍यातील रेमडेसिव्हिर इंजेक्‍शनचा तुटवडा आहे. त्यामुळे रुग्णांच्या नातेवाईकांची इंजेक्‍शन मिळविण्यासाठी धावपळ होत आहे. अशाच एका तरुणाने या इंजेक्‍शनसाठी तीन तालुके पालथे घातले. मात्र तरीही इंजेक्‍शन मिळाले नाही. अखेर एका ओळखीच्या व्यक्तीच्या मध्यस्थीने त्याला जास्त पैसे मोजून ही इंजेक्‍शन मिळाले.

हेही वाचा: जिल्हा बॅंकेच्या शाखेस 25 हजारांचा दंड

सध्या जिल्ह्यात रेमडेसिव्हिर इंजेक्‍शनचा तुटवडा आहे. धावपळ करूनही रुग्णांच्या नातेवाईकांना इंजेक्‍शन मिळत नाही. येथील एका तरुणाच्या नातेवाईकाला या इंजेक्‍शनची गरज होती. त्यासाठी त्याने तीन तालुके पालथे घातले. मात्र तरीही त्याला इंजेक्‍शन मिळाले नाही. त्यानंतर तब्बल वीस हजार रुपये मोजून या तरुणाला त्याच्या ओळखीच्या व्यक्तीच्या मध्यस्थीने इंजेक्‍शन मिळाले. नातेवाईकाचा जीव वाचला हेच खूप आहे, अशी प्रतिक्रियाही त्याने व्यक्त केली.

पाथर्डीत कोविड सेंटरची संख्या वाढली आहे. तीन खासगी वैद्यकीय व्यावसायीकांनी सुरु केलेल्या कोविड सेंटरमध्ये रुग्णांची संख्या वाढत आहे. मात्र तेथे रेमडेसिव्हिर इंजेक्‍शन मिळत नसल्याने रुग्णांना अवाच्या सव्वा दराने ती घ्यावी लागत आहेत.

आमच्याकडे लेखी तक्रार नाही. इंजेक्‍शनचा काळाबाजार होत असेल, तर माहिती दिली पाहिजे. सरकारी कोट्यातून जे इंजेक्‍शन मिळतात ते सरकारी रुग्णालयास दिली जातात. तक्रार आली, तर चौकशी करुन कारवाईसाठी वरिष्ठांना अहवाल पाठवू.

- डॉ. भगवान दराडे, तालुका आरोग्याधिकारी, पाथर्डी