esakal | पवार कुटुंबात कोणताही वाद नाही... जवळच्या मंत्र्याला माहिती आहे गुपित
sakal

बोलून बातमी शोधा

There is no dispute in the Pawar family ... The nearest minister knows the secret

कर्जुले हर्या(ता.पारनेर) येथे आमदार निलेश लंके यांच्या माध्यमातून उभारण्यात आलेल्या १ हजार बेडची क्षमता असणा-या कोविड सेंटर च्या उद्गाटन कार्यक्रमास आले होते.

पवार कुटुंबात कोणताही वाद नाही... जवळच्या मंत्र्याला माहिती आहे गुपित

sakal_logo
By
सनी सोनावळे

टाकळी ढोकेश्वर : पवार कुटुंब हा आदर्शवत परीवार आहे. राज्यातील अनेक परीवार त्यांच्याकडून बोध घेतात. पार्थ पवारदेखील समजदार युवक आहेत. त्यांच्याबाबतीत चाललेली ही चर्चा लवकरच संपेल. त्यांची कुठलीच अडचण राहणार नाही, असे मत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी व्यक्त केले.

मंत्री टोपे यांचे पवार कुटुंबासोबत घनिष्ट नाते आहे. त्यांचे वडील अंकुश टोपे आमदार असल्यापासून ते पवार कुटुंबाच्या जवळचे समजले जातात.त्यामुळे टोपे कुटुंबाला पवारांच्या घरातील सर्व गोष्टींची माहिती असते. त्यामुळेच त्यांनी कोणताही वाद नसल्याचे गुपित सांगतिले.

कर्जुले हर्या(ता.पारनेर) येथे आमदार निलेश लंके यांच्या माध्यमातून उभारण्यात आलेल्या १ हजार बेडची क्षमता असणा-या कोविड सेंटर च्या उद्गाटन कार्यक्रमास आले असता पत्रकारांनी त्यांना पार्थ पवार यांच्या नाराजीविषयी विचारले असता त्यांनी वरील प्रतिक्रिया दिली.

टोपे म्हणाले, पवार परीवार हा अंत्यत आदर्शवत असा परीवार आहे. त्यांच्यापासुन ख-या अर्थाने महाराष्ट्रातील सर्व परीवार बोध घेतात. सर्वच क्षेत्रात त्यांनी प्रगती साधली आहे. कुटुंबातील सर्वच सदस्य अंत्यत कर्तुत्वान आहेत.

हेही वाचा - या गावाला आहेत तीस वेशी

आता तिसरी पिढीदेखील आपले कर्तुत्व दाखवत आहे. सर्वजण एकीने काम करत आहेत. छोट्या गोष्टी घडत असतात. त्या दुरुस्त करण्याची व्यवस्था पवार कुटुंबात आहे. पार्थ हा माझा जवळचा मित्र आहे, ते अंत्यत समजदार युवक आहेत. त्यांची कुठलीच अडचण राहणार नाही, याची मला खात्री आहे, असे टोपे यांनी सांगितले.

संपादन - अशोक निंबाळकर