शेवगावात कापूसकोंडीची गोष्ट ः निम्म्याहून अधिक शेतकऱ्यांचा माल घरात पडून

There is no purchase of cotton in Shevgaon
There is no purchase of cotton in Shevgaon
Updated on

शेवगाव : खरीप हंगाम तोंडावर आला असतांना नोंदणी केलेल्या तालुक्यातील साडेअकराशे शेतक-यांचा कापूस विक्रीअभावी घरात पडुन आहे. चापडगाव येथील पणन महासंघाच्या केंद्रावर आतापर्यत 78 हजार क्विंटल कापसाची खरेदी झाली आहे. अद्यापि 60-70 टक्के कापूस घरात असल्याने हंगामपूर्व मशागतीसाठी व खते बियाणांच्या खरेदीसाठी शेतकऱ्यांवर उधार- उसनवारीची वेळ आली आहे.

तालुक्यात कापूस उत्पादन मोठ्या प्रमाणावर होत असल्याने राज्य सरकारच्या पणन महासंघातर्फे खरेदी केंद्र सुरू करण्यात आले. मात्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लाँकडाऊनमुळे दीड महिना कापूस खरेदी बंद होती. आता पंधरा दिवसांपासून खरेदी सुरु झाली अाहे. त्यासाठी आँनलाईन नोंदणी केलेली आहे. त्यानुसार चापडगाव केंद्रावर 1450 शेतक-यांनी नोंदणी केलेली अाहे. त्यातील 300 शेतक-यांचा आतापर्यत कापूस खरेदी झाला आहे.

नोंदणी केलेल्या आणि कापूस खरेदी झालेल्या शेतक-यांचा विचार करता अजून सुमारे साठ ते सत्तर टक्के कापूस शेतक-यांकडे पडून असल्याचे दिसून येते. खरीप हंगाम पंधरा दिवसावर आलेला असतांना खते, बियाणे खरेदीसह हंगामपूर्व मशागतीच्या कामासाठी शेतकरी आर्थिक अडचणीत असल्याने शासनाने त्वरीत कापूस खरेदी करावा अशी मागणी केली जात आहे. सध्या खरेदी केंद्रावर खरेदीचा वेग फारसा जास्त नसल्याने कापूस खरेदी होईल की नाही याची चिंता शेतक-यांना लागली आहे. 
 

दर्जेदार कापूस खरेदीचा आदेश

कापसाच्या वेचणीला साधारण डिसेंबरमध्ये सुरवात होते. फेब्रुवारीपर्यतच्या वेचणीचा कापूस चांगल्या प्रतीचा असतो. त्यामुळे मार्चपर्यत विक्री झालेला कापूस चांगल्या दर्जाचा असतो. त्यानंतरचा कापूस फरदड, कवडी, लेंडी प्रकारचा व दर्जा घसरलेला असतो, असे खरेदी केंद्रावरील ग्रेडर सांगतात. एफएक्यु दर्जाचाच कापूस खरेदी करायचे आदेश असल्याने उर्वरित दर्जाचा कापूस परत पाठवला जातो. अशी दहापैकी किमान तीन-चार वाहने परत पाठवली जातात, त्यामुळे अशा कापसाचे करायचे काय असा प्रश्न शेतक-यांसमोर उभा ठाकला आहे.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com