धनदांडग्यांसाठी होते कृषी कायदे | Ahmednagar | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बाळासाहेब थोरात; काँग्रेसकडून शेतकरी विजय दिवस साजरा

अहमदनगर : धनदांडग्यांसाठी होते कृषी कायदे

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

तळेगाव दिघे : काही धनदांडग्यांना ताकदवान बनवायचे, त्यांनी पैसा कमवायचा व त्यावर राजकारण सुरू ठेवायचे. त्यासाठी केंद्र सरकारने शेतकरीविरोधी कायदे केले होते, अशी टीका महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केंद्र सरकारवर केली. मात्र, शेतकरी आंदोलनापुढे मोदी सरकारला झुकावे लागले, असेही ते म्हणाले.

तळेगाव दिघे (ता. संगमनेर) येथे काँग्रेसच्या वतीने शेतकरी विजय दिवस साजरा करण्यात आला. त्याप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी आमदार डॉ. सुधीर तांबे होते. बाजीराव खेमनर, लक्ष्मण कुटे, जिल्हा परिषद सदस्य महेंद्र गोडगे पाटील, प्रभाकर कांदळकर, गणपत सांगळे, साहेबराव गडाख, सुभाष सांगळे, सरपंच बाबासाहेब कांदळकर, उपसरपंच रमेश दिघे, रामदास वाघ, बाबा ओहोळ, सभापती सुनंदा जोर्वेकर, उपसभापती नवनाथ अरगडे, सचिन दिघे, अनिल कांदळकर उपस्थित होते.

हेही वाचा: नागपूर : किरकोळ बाजारात टोमॅटो १०० रु. किलाे

ते म्हणाले, की केंद्र सरकारने शेतकरीविरोधी कायदे केले होते. करार शेतीचा कायदा केला होता. त्याविरुद्ध पंजाब- हरियानातील शेतकऱ्यांनी आंदोलन केले. त्यांचे रस्ते केंद्र सरकारने अडविले. रस्त्यात खिळे ठोकले. मात्र, शेतकरी आंदोलनाचा विजय झाला. पाच राज्यांच्या निवडणुका जवळ आल्या. शेतकरी, कामगार विरोधात गेल्याचे व लोक बाहेर फिरू देणारे नाहीत, हे लक्षात आल्याने केंद्र सरकारने शेतकरीविरोधी तीन काळे कायदे मागे घेतले. यावेळी आंदोलनात बलिदान दिलेल्या शेतकऱ्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. शेतकरी आंदोलन यशस्वी करणाऱ्या शेतकरी नेत्यांचे व आंदोलक शेतकऱ्यांचे अभिनंदन करण्यात आले. प्रास्ताविक महेंद्र गोडगे पाटील यांनी केले. सूत्रसंचालन सचिन दिघे व संपत दिघे यांनी केले.

"शेतकऱ्यांना गुलाम करणारे कृषी कायदे करण्यात आले होते. आंदोलनात अनेक शेतकऱ्यांनी बलिदान दिले. त्याचे परिमार्जन पंतप्रधान नरेंद्र मोदी कसे करणार? शेतकऱ्यांच्या बलिदानाची किंमत मोदींना चुकवावी लागेल."

- बाळासाहेब थोरात, महसूलमंत्री

loading image
go to top