किरकोळ बाजारात टोमॅटो १०० रु. किलाे | Nagpur | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

किरकोळ बाजारात टोमॅटो १०० रु. किलाे

नागपूर : किरकोळ बाजारात टोमॅटो १०० रु. किलाे

नागपूर : भाज्यांची आवक वाढू लागल्याने वांगे, कोंथिबीर, पालक, मेथीच्या भावात घसरण झालेली आहे. मात्र, टोमॅटोचे भाव चढेच आहे. टोमॅटो किरकोळ बाजारात १०० रुपये किलो आहे. पुढील आठवड्यापासून भाजीची आवक वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुन्हा भाव घसरण्याचे संकेत आहेत.

आभाळी वातावरण आणि थंडी कमी झालेली आहे. त्यामुळे पिकांच्या गुणवत्तेवर परिणाम होऊ लागला आहे. वातावरण दमट असल्याने शेतातील भाज्यांवर कीड पडू लागली आहे.

सध्या वांगे, कोथिंबीर, फुलकोबी, पानकोबी, कोहळ आदी भाज्यांची आवक वाढली आहे. सध्या ८० ते ९० गाड्यांमधून भाजीची आवक होत आहे. येत्या पंधरा दिवसात त्यात वाढ होणार आहे. त्यामुळे पुढील महिन्यापासून ग्राहकांना स्वस्त भाज्यांचा आनंद लुटता येणार आहे, असे अडतिया भाजी संघटनेचे सचिव राम महाजन यांनी सांगितले.

स्वस्त भाज्या

मेथी,वांगे, फुलकोबी, पानकोबी, कोहळा, मुळा, गाजर,पालक, भेंडी

टोमॅटो ६०, शिमला मिर्ची ६०, फणस ४०, पडवळ ४० , ढेमस ४०

loading image
go to top