गॅस कटर घेऊन बँक फोडायला आले नि गॅसच संपला

गॅस कटर घेऊन बँक फोडायला आले नि गॅसच संपला
Updated on

निघोज :निघोज येथील भैरवनाथ पतसंस्थेच्या शाखेत चोरी करण्याच्या उद्देशाने प्रवेश करुन गॅस कटरच्या सहाय्याने तिजोरी फोडण्याचा प्रयत्न सुरू झाला. 

लोणी मावळा येथील बसस्थानकावर भैरवनाथ पतसंस्थेची शाखा आहे. मंगळवारी ( रात्री) एक च्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी गावातील वेल्डींग गॅस सिलेंडर व गॅस कटरची चोरी केली. त्यानंतर भैरवनाथ पतसंस्थेच्या शाखेच्या मागील बाजुस भिंत तोडली. तसेच शाखेतील तिजोरी गसकटरच्या सहाय्याने तोडण्याचा प्रयत्न केला.

तिजोरी कापत असताना सिलेंडरमधील गॅस संपला. पुढे त्यांना तिजोरी तोडताच येईना. काही केल्याने त्यांना तिजोरी उघडत नसल्याने त्यांनी शेवटी कंटाळून प्रयत्न सोडून पळ काढला. सकाळी ग्रामस्थांच्या ही चोरी निदर्शनास येताच ग्रामस्थांनी पतसंस्था व्यवस्थापनाला माहीती दिली असता पतसंस्था उघडली. त्यावेळी तिजोरीतील रक्कम चोरी गेली नसल्याचे समोर आले. चोरट्यांनी गॅस आणि कटर चोरल्याने त्यांना त्यात किती गॅस आहे याचा अंदाज नव्हता, त्यामुळे त्यांना हा चोरीचा डाव साधता आला नाही.

पारनेर पोलिसांना ही घटना समजताच पोलिस निरीक्षक राजेंद्र गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस पथक घटनास्थळी दाखल झाले. तसेच नगरहुन श्वान पथकालाही पाचारण करण्यात आले होते. पतसंस्थेचे शाखा व्यवस्थापक समीर शेख यांच्या फिर्यादीवरुन पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रमोद वाघ पुढील तपास करीत आहे.

संपादन - अशोक निंबाळकर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com