विश्‍वास ठेवा! ‘हा’ दिल्लीचा लाल किल्ला नाही, तर नगर जिल्ह्यातील आहे ‘हे’ गाव

The story of Wes from Lonimawla village just like Delhi Red Fort
The story of Wes from Lonimawla village just like Delhi Red Fort

पारनेर (अहमदनगर) : लोणीमावळा येथील गावाची दिमाखदार वेस पाहिल्यानंतर असे वाटते की आपण दिल्लीच्या लाल किल्यावर तर नाही ना! तर कधी वाटते एखाद्या ठिकाणचा प्रसिद्ध गडकिल्ला तर आपण पहात आहोत की काय? अशी नाविण्यापुर्ण व आदर्शवत गावची वेस सुशोभित करण्याचे काम लोकवर्गणीतून केले आहे लोणामावळा ग्रामस्थांनी!

आजही या गावाच्या सुमारे 14 एकर परिसराला गावकुस व त्या गावकुसाला मोठमोठे बुरूंज गावाच्या संरक्षणासाठी ऊभे आहेत. आता मात्र यातील गावकुसाची काही भागात पडझड झाली आहे. ती डागडुजी करून गावाचे गावपण व इतिहासाची जपवणुक व्हावी, अशी अपेक्षा ग्रामस्थांसह तालुक्यातील अनेक इतिहासप्रेमी व जाणकारारांची आहे.

राज्यातील किल्ल्यांची भटकंती करताना अनेक ठिकाणी आपणास गिरिदुर्ग, जलदुर्ग, वनदुर्ग, भूदुर्ग असे प्रकार पहावयास मिळतात. या प्रत्येक दुर्ग प्रकारात मोठ्या प्रमाणात विविधता आढळून येते.

ज्याप्रमाणे नगर येथे भुईकोट किल्ला आहे. त्याच प्रमाणे तालुक्यात लोणीमावळा येथे असलेला नगरदुर्ग आहे. हा नगरदुर्ग म्हणजे गावाभोवती असलेली सरंक्षक तटबंदी होय. लोणीमावळा गाव सुमारे 14 एकर जमिनीवर तटबंदीच्या आत वसलेले असुन आहे. ही संपुर्ण तटबंदी षटकोनी आकारात आहे. या तटबंदीत दरवाजाशेजारी दोन व प्रत्येक कोपऱ्यात एक असे एकुण नऊ गोलाकार बुरूंज आहेत.

मात्र या बुरूंजावर तसेच तटबंदीवर कोणत्याही प्रकारे गावाचे सरंक्षण करण्याची व्यवस्था नाही. गावात प्रवेश करताना सर्वप्रथम समोर दिसतो तो कोटाचा दरवाजा म्हणजे भली मोठी गावाची वेस होय. या वेशीला म्हणजेच दरवाजाला लाकडी दारे आजही शिल्लक आहेत. वेशीच्या बाहेर एक मारूतीचे मंदीर आहे. डाव्या बाजूच्या बुरूंजा शेजारी एक विहीर आहे. ती सध्या कचऱ्याने भरलेली आहे. वेशीच्या दोन्ही बाजूस दोन भव्य बुरूंज असुन त्यांची उंची सुमारे तीस फुट असावी. बुरूंजाचे व दरवाजाचे खालचा भाग सुमारे 15 फुटांचे बांधकाम दगडी असुन वरील बांधकाम विटांचे आहे. या बुरूंजामध्ये मात्र आतील बाजूने बंदुकीतून शत्रूंवर मारा करता यावा या साठी छिद्र ठेवण्यात आली आहेत.

वेशीच्या आतील बाजुने वेशीवर वर जाण्यासाठी दोन बाजुंनी दोन जिने आहेत. संपुर्ण गावाभोवती गावकुस म्हणजेच तटाची उंची उंची 10 तर रूंदी चार फूट असावी. या तटबंदीवर कोठेही जाण्यासाठी सोय केलेली नाही. या तटबंदीचे बांदकाम फक्त दगडावर दगड रचुन केले आहे. अशा प्रकारे एक अनोखी ओळख या गावाची या तटबंदीमुळे तालुक्यातच नव्हे तर जिल्ह्यात आहे.

संपादन : अशोक मुरुमकर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com