
आतील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चोरी करताना एक चोर व बाहेर चार जण असे पाच जण असल्याचे दिसत आहे.
श्रीगोंदे : तालुक्यातील देवदैठण येथे रेणुका ज्वेलर्स या सराफी पेढीचे शटर उचकटून आज पहाटे अज्ञात चोरट्यांनी दुकानात ठेवलेले तीन किलो वजनाचे चांदीचे दागिने लंपास केले. पोलिसांनी या दागिन्यांची किंमत दीड लाख रुपये ठरवले असून, यापूर्वीही या ज्वेलर्सला रस्त्यात लुटून मोठी रक्कम चोरीला गेली आहे.
बेलवंडीचे पोलीस निरीक्षक अरविंद माने यांनी सांगितले, पंकज किशोर डहाळे रा.शिरूर यांच्या मालकीचे देवदैठण येथे असणाऱ्या रेणुका ज्वेलर्स या दुकानाचे लोखंडी शटर अज्ञात चोरट्यांनी आज पहाटे साडेचार वाजण्याच्या सुमारास उचकटून आत प्रवेश केला.
हेही वाचा - सर्वांसाठी घरे देऊ - कानडे
आतील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चोरी करताना एक चोर व बाहेर चार जण असे पाच जण असल्याचे दिसत आहे. चोरट्यांनी दुकानात नव्याने आणून ठेवलेले तीन एक किलो वजनाचे एक दीड लाख रुपये किमतीचे चांदीचे दागिने चोरले.
घटना घडल्यानंतर पोलिस घटनास्थळी गेले. सकाळी श्वान व तज्ञ पथक पाचारण करण्यात आले होते. पोलीस चोरट्यांचा शोध घेत असून याप्रकरणी शिरूर व श्रीगोंदे तालुक्यात चौकशी चालू आहे.