
संगमनेर : तालुक्यातील आंबीखालसा व हिवरगाव पठार या दोन्ही गावांत रात्रीच्या वेळी चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे. तीन मालवाहतूक करणाऱ्या पिकअपचे दहा टायर व टेम्पोच्या डिझेल टाकीतून ऐंशी लिटर डिझेल चोरून पोबारा केला आहे. त्यामुळे वाहनचालक चांगलेच भयभीत झाले आहेत, तर दुसरीकडे घारगाव पोलिसांच्या कामकाजाविषयी ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली आहे.