
औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे सर्व अभ्यासक्रम हे रोजगाराभिमुख असून प्रशिक्षण पुर्ण केल्यानंतर उमेदवारांना शिकाऊ उमेदवारीच्या संधी उपलब्ध आहेत, तर प्रत्येक व्यवसायांमध्ये महिलांसाठी 30 टक्के जागा राखीव आहेत.
नगर ः येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था ( आयटीआय) च्या 2020-21 साठी प्रवेशाची तिसरी फेरी सुरू झाली आहे. त्यामुळे जास्तीत जास्त उमेदवारांनी आपले प्रवेश निश्चीत करावेत, असे अवाहन शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतर्फे करण्यात आले आहे.
शनिवार (12 डिसेंबर ) पासून तिसऱ्या फेरीचे प्रवेश सुरू झालेले आहेत. यात ज्या उमेदवारांना ऍलॉटमेंट लेटर मिळाले आहेत त्यांनी संबंधीत आयटीआयशी आवश्यक कागदपत्रे व प्रवेश शुल्क भरून प्रवेश निश्चीत करावेत, असे अवाहन संस्थेतर्फे करण्यात आले आहे.
हेही वाचा - अहमदनगरचे कलेक्टर राहतात महालात
औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे सर्व अभ्यासक्रम हे रोजगाराभिमुख असून प्रशिक्षण पुर्ण केल्यानंतर उमेदवारांना शिकाऊ उमेदवारीच्या संधी उपलब्द आहेत, तर प्रत्येक व्यवसायांमध्ये महिलांसाठी 30 टक्के जागा राखीव आहेत.
या बरोबरच आयटीआयचे प्रशिक्षण पुर्ण केल्यानंतर खासगी औद्योगिक कारखाने, सरकारी आस्थापना ( विद्यूत महामंडळे, रेल्वे विभाग, परिवहन महामंडळ, औष्णिक विद्यूत केंद्र) या ठिकाणी नोकरीच्या संधी उपलब्ध आहेत, असे संस्थेच्या प्राचार्यांनी सांगितले.
आयटीआयच्या प्रवेशासाठी उमेदवारांनी www.admission.dvet.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी, असे अवाहन शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.
अहमदनगर