पोलिस भरती निघाली की लगेच उडी मारायची, तरूणांचा कसून सराव

गौरव साळुंके
Friday, 28 August 2020

कोरोना विषाणूने सामान्य नागरीकांचे जीवन बदलले आहे. काहीचे रोजगार गेले तर अनेकांना उपासमारीचा समाना करावा लागला. त्यामुळे राज्यभरातील लाखो उच्चशिक्षीत बेरोजगार तरुण सध्या पोलिस भरती प्रक्रियेसह सरकारी तसेच खासगी नोकरीच्या शोधात आहे. ग्रामीण भागात रस्त्याच्याकडेला शेकडो तरुण पहाटे आणि सायंकाळी धावण्याचा सराव करीत आहे.

श्रीरामपूर ः ग्रामीण भागातून कामानिमित्त पुणे-मुंबईला सारख्या महानगरात गेलेले तरुण कोरोनाच्या धास्तीने सध्या ग्रामीण भागात आहेत. त्यामुळे उच्चशिक्षित तरुण गावाकडे राहुन आता शेतीक्षेत्रात नवनवीन प्रयोग राबवित आहे. परंतु व्यापारी आणि सरकारकडुन शेतकऱ्यांची फसवणुक होत असल्याने शेती सोडून ग्रामीण भागातील तरुण पोलिस भरतीच्या सरावाकडे वळाले आहे. 

राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर लवकरच पोलिस भरती घेणार असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जाहीर केले होते. सरकार स्थापनेनंतर मंत्रीमंडळाचा विस्तार झाला. त्यात राज्याच्या गृहमंत्रीपद अनिल देशमुख यांच्याकडे आले. निवडणुकीनंतर राज्यकारभार रुळावर येताना चीनमध्ये सुरु झालेला कोरोनाचा संर्सग राज्यासह देशभरात पसरला. कोरोनाशी लढताना पाच महिने उलटुन गेले. कोरोनाच्या संकटात अनेक अडचणीचा सामोरे जावे लागले.

हेही वाचा - सोनईत बेकायदा बांधकामांवर पडणार हातोडा

कोरोना विषाणूने सामान्य नागरीकांचे जीवन बदलले आहे. काहीचे रोजगार गेले तर अनेकांना उपासमारीचा समाना करावा लागला. त्यामुळे राज्यभरातील लाखो उच्चशिक्षीत बेरोजगार तरुण सध्या पोलिस भरती प्रक्रियेसह सरकारी तसेच खासगी नोकरीच्या शोधात आहे. ग्रामीण भागात रस्त्याच्याकडेला शेकडो तरुण पहाटे आणि सायंकाळी धावण्याचा सराव करीत आहे.

लवकरच पोलिस भरती होणार असल्याने शेकडो तरुण मैदानी सरावावर लक्ष देत आहे. भरती निघाल्यानंतर अल्पावधीत मैदानी चाचणी होते. मैदानी सरावासाठी सातत्य आणि मोठा सराव लागतो. त्यामुळे भरती लवकरच निघेल, अशी आशा ठेवुन तरुणांई मैदानी सरावासाठी रस्त्याच्याकडेला धावते. ग्रामीण भागात प्रामुख्याने शेतीसह शेतीपुरक व्यवसाय केले जातात.

नगर जिल्यात दुध व्यवसाय मोठ्या प्रमाणात आहे. दुध व्यवसायातुन कुटूंबाला आर्थिक आधार मिळतो. गायींना चारा-वैरणी करुन उर्वरीत वेळेत तरुणाई लेखी परिक्षेचा सराव करते. दिवसभर शेतीकामे राहुन पहाटे आणि सायंकाळी मैदानी सराव तसेच रात्री घरी स्वयंअध्ययन असा दिनक्रम ग्रामीण भागातील उच्चशिक्षित तरुणांईचा बनला आहे.

 

शिक्षण झाल्यानंतर नोकरीचा शोध घेवुनही चांगली नोकरी मिळत नाही. कोरोनामुळे बेरोजगारीचे संकट आणखी वाढले आहे. पोलिस भरती कधी निघेल सांगता येत नाही. परंतु आम्ही रोज नियमित मैदानी सरावासह लेखीची तयारी करतो. सरकारने तात्काळ पोलिस भरती घेवुन तरुणांना नोकरीची संधी उपलब्ध करुन द्यावी. शेतीतुन फारसा नफा मिळत नाही. त्यामुळे चांगल्या नोकरीसाठी आम्ही प्रयत्नशिल आहोत.

- जगदीश बोरुडे - उच्चशिक्षित तरुण, श्रीरामपूर.

संपादन - अशोक निंबाळकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Thorough practice of youth for police recruitment