
श्रीरामपूर: गोदावरीच्या तीरावर सकाळच्या कोवळ्या उन्हात, भगव्या पताकांची निळ्याशार आकाशाशी स्पर्धा सुरू होती... टाळ, मृदंगाच्या लयीत हरिनामाचा निनाद होत होता. योगीराज गंगागिरी महाराजांचा १७८वा अखंड हरिनाम सप्ताह म्हणजे केवळ अध्यात्मिक सोहळा नाही, तर मनोवृत्तीच्या परिवर्तनाचं मोठं जागर आहे... आणि हाच मंत्र महंत रामगिरी महाराजांनी भाविकांच्या मनावर कोरला ‘मन बदलल्याशिवाय समाज कधीच बदलत नाही,’