esakal | UPSC : मराठमोळ्या पोलीस अधिकाऱ्याचे मार्गदर्शन; तब्बल 1000 विद्यार्थी झाले सनदी अधिकारी!
sakal

बोलून बातमी शोधा

IPS mahesh bhagwat

UPSC : पोलीस अधिकाऱ्याचे मार्गदर्शन; 1000 विद्यार्थ्यांचे यश!

sakal_logo
By
टीम ई सकाळ

पाथर्डी (जि.अहमदनगर) : पाथर्डीचे रहिवासी व तेलंगणातील रचाकोंडा विभागाचे पोलिस आयुक्त व मराठमोळे अधिकारी असलेले महेश भागवत....(UPSC) स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना सोशल मीडियाचा आधार घेत मार्गदर्शन करण्याचे काम भागवत (IPS Officer Mahesh Bhagwat) यांनी सात वर्षांपूर्वी सुरू केले.. आणि आतापर्यंत जवळपास एक हजार विद्यार्थी सनदी अधिकारी झाले आहेत.. यामुळे पाथर्डीच्या शिरपेचात भागवत यांच्या या कार्याने मानाचा तुरा खोवला गेला आहे.

आतापर्यंत जवळपास एक हजार विद्यार्थी सनदी अधिकारी

भागवत हे मूळचे पाथर्डीचे रहिवासी. १९९५ मध्ये ते आयपीएस अधिकारी झाले. स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना सोशल मीडियाचा आधार घेत मार्गदर्शन करण्याचे काम भागवत यांनी सात वर्षांपूर्वी सुरू केले. त्यांनी तयार केलेल्या दोन व्हॉट्‍स ॲप ग्रुपमध्ये देशभरातील विद्यार्थ्यांचा समावेश आहे. नुकताच यूपीएससीचा जो निकाल जाहीर झाला, त्यात दिल्ली येथील अंकिता जैन व वैशाली जैन या बहिणींनी तिसरा व २१ वा क्रमांक पटकावला, तर आंध्र प्रदेशातील दोन बंधूंनीही या परीक्षेत यश मिळवले. तेलंगण राज्यातून पहिल्या आलेल्या पी. श्रीजा हिला सुद्धा भागवत यांचे मार्गदर्शन लाभले. राज्यात दुसरा तर देशात ३७ व्या क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या विनायक नरवडे व तालुक्यातील करंजी येथील राकेश अकोलकर व तोंडोळी येथील सुहास गाडे यांना सुद्धा भागवत यांनी मार्गदर्शन केले आहे. विशेष म्हणजे विना मोबदला हे मार्गदर्शन केले जाते. भागवत यांनी मार्गदर्शन केल्याने आतापर्यंत जवळपास एक हजार विद्यार्थी सनदी अधिकारी झाले आहेत.

हेही वाचा: अखेर ठाकरेंच्या 'या' निर्णयावर राज्यपाल करणार खुषीने सही!

१९ उमेदवार शंभराच्या आतील रँकमध्ये

संघ लोकसेवा आयोगाने घेतलेल्या परीक्षेत जे ७६१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले, त्यांतील तब्बल १३१ विद्यार्थ्यांना रचाकोंडा विभागाचे पोलिस आयुक्त व मराठमोळे अधिकारी असलेले महेश भागवत यांनी मार्गदर्शन केले. त्यांतील १९ उमेदवार शंभराच्या आतील रँकमध्ये उत्तीर्ण झाले आहेत. या ग्रुपद्वारे नितीश पाथोडे, शैलेंद्र देवळाणकर, नीलकंठ आव्हाड, मुकुल कुलकर्णी, डॉ. विवेक कुलकर्णी, श्रीकर परदेशी, अभिषेक सराफ यांच्यासह अनेक अधिकारी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतात.

गेल्या सात वर्षांपासून आपण विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत आहोत. यामध्ये काही गरीब घरातील मुलेही असून, मुख्य मुलाखतीसाठी सर्वच विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण करण्याचे काम केले जाते. हे यश माझ्या एकट्याचे नसून, आंतरराष्ट्रीय संबंधांचे तज्ज्ञ डॉ. शैलेंद्र देवळाणकर यांचा सिंहाचा वाटा आहे. - महेश भागवत, पोलिस आयुक्त, रचाकोंडा

हेही वाचा: भावना गवळी यांनी ७ कोटींची चोरी केली - किरीट सोमय्या

विद्यार्थ्यांना दिला मानसिक आधार

कोरोना काळात काही विद्यार्थी मानसिकदृष्ट्या खचले होते. या वेळी महेश भागवत यांनी विशेष तज्ज्ञांची एक टीम तयार केली. मानसिकदृष्ट्या खचलेल्या विद्यार्थ्यांना आधार देण्याचे काम या टीमने केले.

loading image
go to top