esakal | अखेर ठाकरेंच्या 'या' निर्णयावर राज्यपाल करणार खुषीने सही! निराळी 'युती'
sakal

बोलून बातमी शोधा

koshyari thackeray

अखेर ठाकरेंच्या 'या' निर्णयावर राज्यपाल करणार खुषीने सही!

sakal_logo
By
ज्ञानेश सावंत

मुंबई : ठाकरे सरकारच्या (CM Uddhav Thcekaray) निर्णयांवर एरवी आढेवेढे घेणारे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी (Governor Bhagatsingh Koshyari) यावेळी मात्र खुषीने सही करणार असल्याचे समजते. यानिमित्ताने राज्यपाल, ठाकरे एकत्र यांचीही निराळी 'युती' ही उघड होणार आहे. नियुक्त १२ आमदारांच्या यादीपासून ठाकरे सरकारच्या भूमिकांवर राज्यपाल मात्र नेहमीच अडून असल्याचे दिसून आले. अलीकडच्या काळात महिला अत्याचार, त्यासाठीचे विशेष अधिवेशन, विधानसभा अध्यक्षांच्या निवडीसह अन्य महत्त्वांच्या निर्णयावर राज्यपाल कोश्यारी-ठाकरे यांच्यातील संघर्ष पेटला होता.

१२ आमदारांच्या यादीवर अद्याप स्वाक्षरी नाहीच..पण 'या' मसुद्यावर करणार सही

ठाकरे सरकारच्या अनेक निर्णयांत हस्तक्षेप करीत, एखाद्या विरोधी पक्षाप्रमाणे राज्यापाल तुटून पडल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे राज्यापाल, ठाकरे सरकार यांच्यातील संघर्ष पेटत चालल्याचे चित्र दिसते. १२ आमदारांच्या यादीवर अद्याप स्वाक्षरी झालेली नाही. मात्र, महापालिका निवडणुका जिंकण्यासाठी अत्यंत महत्त्वाच्या प्रभाग पध्दतीवर महाविकास आघाडीची मोहोर असेल.

हेही वाचा: दबावाला बळी पडून आरक्षणाचा निर्णय नको; मराठा क्रांती मोर्चाचा इशारा

ठाकरे सरकारच्या निर्णयांवर आढेवेढे घेणारे राज्यपाल करणार खुषीने सही!

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी पाठविलेल्या मसुद्यावर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) आज सही करण्याची शक्यता आहे. त्याचे कारणही तसे म्हणजे, प्रभाग पध्दत राज्यपालांच्या पक्षाच्या अर्थात भाजपला परवडणारी आहे. प्रभागावरून दोन्ही काँग्रेसच्या रोषाचा अंत न पाहताच मुख्यमंत्री ठाकरे यांनी नव्या प्रभाग पद्धतीचा मसुदा राज्यपालांकडे धाडला. तिन्ही पक्षांच्या सोयीचे प्रभाग राहण्याची शक्यता असतानाही मुख्यमंत्री यांनी मात्र चारऐवजी एक-दोन सदस्यांचा प्रभाग करणे अपेक्षित होते. त्याचा शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसला फायदा होऊन, या तिन्ही पक्षांची ताकद वाढण्याची आशा होती. याच पक्षांच्या मनाप्रमाणे प्रभाग पद्धती ठरण्याचा अंदाज ठाकरे यांनी खोडून काढत, तीन सदस्यांचा प्रभाग केला.

हेही वाचा: दहशतवाद विरोधी अभ्यासासाठी भारताचे पथक पाकिस्तानात जाणार

इशारा देऊनही ठाकरे ठाम

काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस नाराजी आणि आक्रमक होण्याचा इशारा देऊनही ठाकरे ठाम राहिले आणि मंत्रिमंडळाच्या दुसऱ्या बैठकीत तीनचा प्रभाग कायम ठेवला. त्यानंतर अध्यादेशासाठी तीनच्या प्रभागांचा मसुदा राज्यपालांकडेही पाठविला; या प्रक्रियेत वेळ न दडवता, पुढच्या आणि नेमक्या कार्यवाहीलाही ठाकरे यांनीच वेग दिला आहे. ही संधीच समजून राज्यपालही आता लगेच मसूद्यावर स्वाक्षरी करणार असल्याचे स्पष्ट आहे.

loading image
go to top