
श्रीरामपूर : श्रीरामपूर शहरासह वडाळा महादेव, उंदीरगाव येथे नायलॉन मांजाची विक्री करणाऱ्या तिघांना पोलिसांनी पकडले. त्यांच्याकडून १५ हजार २५० रुपये किमतीचा नायलॉन मांजा जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी श्रीरामपूर शहर व तालुका पोलिस ठाण्यात वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.