श्रीगोंदे-काष्टी रस्त्यावरअपघात, तिघा मित्रांचा दुर्दैवी अंत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Rahul Keshav and Aakash
श्रीगोंदे-काष्टी रस्त्यावरअपघात, तिघा मित्रांचा दुर्दैवी अंत

श्रीगोंदे-काष्टी रस्त्यावरअपघात, तिघा मित्रांचा दुर्दैवी अंत

श्रीगोंदे - श्रीगोंदे शहराजवळील काष्टी रस्त्यावर कार व उसाच्या ट्रॅक्टरच्या (Tractor) अपघातात (Accident) मोटारीतील तिघा मित्रांचा दुर्दैवी अंत (Death) झाला. हा अपघात शनिवारी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास झाला.

या अपघातात राहुल सुरेश आळेकर, वय-२२, रा. श्रीगोंदे, केशव उर्फ शंकर पांडुरंग सायकर- वय-२२, रा. काष्टी, आकाश रावसाहेब खेतमाळीस, वय-१९, रा. श्रीगोंदे हे तिघेजण जागीच ठार झाले. आकाश व राहुल हे केशव सायकरला सोडविण्यासाठी काष्टीला जात असताना अपघात झाला. तिनही मित्रांचा दुर्दैवी मृत्यू झाला. याप्रकरणी पोलिसात ट्रॅक्टर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

हेही वाचा: अहमदनगर : शून्य टक्के व्याजाचे कर्ज १९५१ कोटी

पोलिसांकडून समजलेल्या माहितीनुसार ट्रॅक्टर क्रमांक एम एच १६ ए एम ९०२२ हा सदर ट्रॅक्टर व दोन ऊसाने भरलेल्या ट्रॉल्यांचे जुगाड रस्त्याच्या मध्यभागी कोणतेही उपाय योजना न करता,काळजी न घेता रोडवरुन येणारे जाणारे लोकांचा अपघात होईल अशा पध्दतीने उभे होते. त्यावर या मुलांची मोटार कार जाऊन धडकली. यात हे तिघे जण ठार झाले.

Web Title: Three Friends Death In Accident

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :accidentdeath3 friends
go to top