esakal | पोलिसांशी अरेरावी करून धक्का मारण पडल महागात; तिघांना अटक
sakal

बोलून बातमी शोधा

crime news

पोलिसांशी अरेरावी पडली महागात; तिघांना अटक

sakal_logo
By
सुनिल गर्जे

नेवासे (जि. अहमदनगर) : नेवासे पोलिस व ऑडिओ क्लिप हे समीकरण गेल्या तीन-चार घटनांतून चांगलेच चर्चेत आले. या सर्व ऑडिओ क्लिपमुळे पोलिस अधिकारी व कर्मचारी अडचणीत आले. मात्र, शनिवारी (ता. नऊ) पोलिस निरीक्षकांच्या दालनात चर्चेदरम्यान चोरून व्हिडिओ शूटिंग करून पोलिसांशी अरेरावी करून त्यांना धक्का देणाऱ्या तिघांना पोलिस निरीक्षक बाजीराव पोवार यांनी पोलिस कोठडीची हवा दाखवली.

पोलिस कर्मचाऱ्यांना ढकलले

या प्रकरणी पोलिस कर्मचारी गोवर्धन पवार यांनी फिर्याद दिली आहे. याबाबत माहिती अशी की कुकाणा दूरक्षेत्राच्या जागेवर असलेल्या अनधिकृत टपऱ्या हटविण्याच्या नोटिसा देऊन शनिवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास टपरीधारकांना पोलिस ठाण्यात बोलविण्यात आले होते. त्यावेळी सहायक पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर थोरात, उपनिरीक्षक समाधान भाटेवाल, पोलिस कर्मचारी अंबादास गिते, बाळासाहेब खेडकर, केवल रजपूत हे पोलिस ठाण्यात हजर होते. १५ ते २० टपरीधारक पोलिस निरीक्षक बाजीराव पोवार यांच्या दालनात गेले. पोवार त्यांच्याशी चर्चा करत असताना टपरीधारकांपैकी दोघे मोबाईलवर व्हिडिओ शूटिंग करत होते. त्यांना तुम्ही कोणाचे शूटिंग करत आहाता, अशी विचारणा पोलिसांनी केली असता, त्यांनी अरेरावी करत पोलिस कर्मचारी पवार यांना ढकलून दिले. त्यानंतर उपस्थित अधिकारी व कर्मचाऱ्यांनी त्यांना ताब्यात घेतले.

हेही वाचा: अहमदनगर : चोरट्यांनी जिलेटिनचा स्फोट घडवून लुटले ATM

त्यांना नावे विचारली असता, त्यांनी अन्सार अल्लीभाई इनामदार व बाळासाहेब रावसाहेब जावळे (दोघे रा. कुकाणा) असे सांगितले. त्यानंतर इनामदार व जावळे यांच्याकडील मोबाईलची पाहणी केली असता, सदर मोबाइलमध्ये पोलिस निरीक्षकांच्या कामकाजाचे शूटिंग आढळून आले. सदर व्हिडिओ कुणाच्या सांगण्यावरून काढला, अशी विचारणा केली असता, त्यांनी वसीम सुलेमान सय्यद याचे नाव सांगितले. सदर मोबाईल पंचनामा करूनजप्त करण्यात आला. वरील तिघांवर सरकारी कामात अडथळा, शासकीय गुपिते अधिनियमा प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा: श्रीगोंदे पालिकेचे दोन प्रकल्प धूळखात

loading image
go to top