esakal | श्रीगोंदे पालिकेचे दोन प्रकल्प धूळखात; मुदत संपली तरी काम अपुर्ण
sakal

बोलून बातमी शोधा

Construction work

श्रीगोंदे पालिकेचे दोन प्रकल्प धूळखात

sakal_logo
By
संजय आ. काटे

श्रीगोंदे (जि. अहमदनगर) : स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सात वर्षांपुर्वी नगरपालिकेने साठ लाखांच्या कामास प्रारंभ केला. मात्र, या केंद्राच्या केवळ भिंतीच उभ्या राहिल्या आणि ज्या जागेवर अभ्यासिका उभारली जात आहे. ती जागा खुल्या क्रिडांगणासाठी आरक्षित असल्याची तक्रार झाली आणि हे काम बंद पडले. त्याच्याच लगत एक कोटी तीन लाख खर्चाच्या क्रीडासंकुलाचे काम तीन वर्षांपुर्वी सुरु झाले. मात्र, तेही मुदत संपली तरी अपुर्ण आहे.

काम बंद करण्याची नामुष्की

शहरातून जाणाऱ्या बाह्यवळण रस्त्यालगत असणाऱ्या जागेत पालिकेने २०१२ मध्ये अभ्यासिका केंद्राचे काम हाती घेतले. त्यावेळी त्या कामासाठी ५९ लाख ३७ हजार खर्चाचे अंदाजपत्रक सादर केले होते. स्पर्धा परीक्षेत बसणाऱ्या विद्यार्थ्यांना येथे मार्गदर्शन, पुस्तकांसह इतर साहित्य मोफत देण्यात येणार होते. दरम्यान, ज्या ठिकाणी ही इमारत उभी राहत होती ती जागा खुल्या क्रिडांगणासाठी आरक्षीत असून पालिकेने कुठलीही मंजूरी न घेता हे बांधकाम सुरु केल्याची तक्रार झाली. पालिकेला त्यावर समाधानकारक उत्तर देता न आल्याने शेवटी केवळ भिंती उभ्या ठेवून हे काम बंद करण्याची नामुष्की आली.
दरम्यान, तीन वर्षांपुर्वी या अभ्यासिका केंद्राच्या बंद असणाऱ्या बांधकामालगत असणाऱ्या मोकळ्या जागेत एक कोटी ३ लाख रुपयांचे क्रिडासंकुल उभारणीचे काम सुरु झाले. या क्रिडासंकुलात खेळाचे मैदान, इनडोअर स्टेडियम, बॅडमिंटन कोर्ट, पोहण्याचा तलाव आदी सुविधा देण्यात आल्याचे सांगण्यात आले. याही कामाच्या भिंती बांधण्यात आल्या. मात्र, त्यानंतर मुदत संपुनही काम अपुर्ण अवस्थेत आहे.

हेही वाचा: Ahmednagar : ‘समुदाय’ची खासगी प्रॅक्टिस जोमात

पावणेदोन कोटीच्या कामांचे केवळ सापळे

पालिकेच्या म्हणण्यानूसार क्रिडासंकुलाच्या जागेत काही लोकांनी अतिक्रमण केलेले आहे. त्यांना हटविल्याशिवाय क्रिडासंकुलाचे काम पुर्ण करता येत नाही. दरम्यान, या दोन्ही प्रकल्पाबाबत पालिकेचा अभ्यास किती कच्चा होता हे बंद पडलेल्या कामावरुन दिसून येते. चुकीच्या जागेत अभ्यासिका उभी करताना कुठेतरी प्रशासनाने वरिष्ठांशी चर्चा करायला हवी होती. त्यातच क्रिडासंकुल उभारणीपुर्वीच तेथील जे अतिक्रमण आहे ते का काढले नाही याचेही उत्तर कुणाकडे नाही. ही जबाबदारी पालिकेची होती. त्यात ते कमी पडल्याने या पावणेदोन कोटीच्या कामांचे केवळ सापळे उभे आहेत.

हेही वाचा: अहमदनगर : चोरट्यांनी जिलेटिनचा स्फोट घडवून लुटले ATM

loading image
go to top