esakal | कंडक्टरच्या कामात अडथळा आणणाऱ्या तीन रिक्षाचालकांना कैद

बोलून बातमी शोधा

Three rickshaw pullers arrested for obstructing conductor's work}

या बाबत बसवाहक प्रमिला आश्रूबा पालवे यांनी शेवगाव पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती.

कंडक्टरच्या कामात अडथळा आणणाऱ्या तीन रिक्षाचालकांना कैद
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नगर : एसटी महिला वाहकाच्या कामात अडथळा आणल्याबद्दल जिल्हा व सत्र न्यायालयाने तीन रिक्षाचालकांना एक महिना साधी कैद व प्रत्येकी एक हजार रुपये दंड केला.

अरविंद योसेफ कांबळे (वय 22), बापू चंद्रभान चव्हाण (वय 27, दोघेही रा. शहरटाकळी) व समीर सय्यद (वय 27, रा. अंत्रे, ता. शेवगाव), अशी त्यांची नावे आहेत. 

या बाबत बसवाहक प्रमिला आश्रूबा पालवे यांनी शेवगाव पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. त्यानुसार भातकुडगाव फाटा येथे 18 जून 2014 रोजी बसमध्ये (एमएच 12 ईएल 6251) येऊन वरील तिघांनी वाहक पालवे यांना धमकावले.

शेवगाव पोलिसांनी त्यांच्याविरुद्ध, शासकीय कामात अडथळा आणणे, तसेच धमकावल्याचा गुन्हा दाखल केला. न्यायालयाने तिघांना एक महिना साधी कैद व प्रत्येकी एक हजार रुपये दंड केला. सरकार पक्षातर्फे ऍड. गोरक्ष मुसळे यांनी काम पाहिले. अहमदनगर